मुंबई : सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हीच सुवर्णसंधी आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-22 या स्कीमच्या पाचव्या मालिकेची विक्री आजपासून होणार आहे. आजपासून पुढील 5 दिवस बाजारपेठेपेक्षा कमी दराने 5 दिवस सोने खरेदी करण्याची संधी आहे. (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series V) 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत स्वस्त सोने खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. गुंतवणूकदार अतिशय कमी दरात सोनं खरेदी करू शकतात. सॉवरेन गोल्ड बॉन्ड आरबीआय (RBI) सरकारकडून जाहीर केली जाते.
9 ऑगस्ट रोजी उघडून ही संधी 13 ऑगस्ट रोजी बंद होईल. तसेच 17 ऑगस्ट 2021 रोजी ते तुम्हाला मिळेल. सबस्क्रिप्शन कालावधीदरम्यान बॉण्डची इश्यू किंमत 4,790 रुपये प्रति ग्रॅम असेल, असे निवेदनात म्हटले आहे. सॉवरेन गोल्ड बाँड सरकारच्या वतीने RBI (RBI) जाहीर केलेत.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही बॉण्डसाठी ऑनलाईन अर्ज केले, तर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच अशा गुंतवणूकदारांसाठी एक ग्रॅम सोन्याच्या बॉण्डची किंमत 4,740 रुपये असेल.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे बाँड सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे विकले जाऊ शकतात. ते स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेत विकले जात नाहीत.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड हा सरकारी बॉण्ड आहे. या बॉण्डचे डीमॅट स्वरूपात रूपांतर करता येते. त्याचे मूल्य रुपया किंवा डॉलरमध्ये होत नाही, तर सोन्यामध्ये त्यांचे मोजमाप होते. जर बॉण्ड 5 ग्रॅम सोन्याचा असेल तर बॉण्डचे मूल्य 5 ग्रॅम सोन्याच्या किमतीइतकेच असेल. हे बाण्ड आरबीआय सरकारने जारी केले आहेत. सार्वभौम सुवर्ण बाँड योजना सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू केली.