स्टेट बँकेनं कर्जाच्या व्याजदरात केली वाढ!

मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवल्यावर आता स्टेट बँकेनं कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरातही वाढ केलीय.

Updated: Mar 2, 2018, 03:21 PM IST
स्टेट बँकेनं कर्जाच्या व्याजदरात केली वाढ!  title=

नवी दिल्ली : मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवल्यावर आता स्टेट बँकेनं कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरातही वाढ केलीय.

उल्लेखनीय म्हणजे, नोव्हेंबर २०१६ नंतर प्रथमच कर्जावरच्या व्याजदरात वाढ करण्यात आलीय. या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज महाग होणार आहे. 

स्टेट बँकेनं गुरुवारी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या कर्जांवरच्या व्याजदरांत एकपंचमांश टक्के म्हणजेच ०.२० टक्क्यांची वाढ केलीय. या निर्णयाचा परिणाम एप्रिल २०१६ नंतर घेतलेल्या सर्वच गृह कर्जदारांवर होईल, असं बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलंय. 

स्टेट बँकेनं व्याजदर वाढीचा निर्णय घेतल्यावर आता इतर बँकाही असेच निर्णय घेण्याची शक्यता आहे.