मुंबई : Stocks to Buy | शेअर बाजारात सध्या मोठे उतार चढाव दिसून येत आहे. 9 मे रोजी व्यवसाय सुरू होताच मोठी घसरण नोंदवली गेली. या परिस्थितीत काही मजबूत शेअरमध्ये गुंतवणूकीच्या संधी दिसून आलीये. मार्च 2022 च्या तिमाही निकालानंतर, ICICI सिक्युरिटीजने Equitas Small Finance Bank Ltd च्या स्टॉकवर खरेदी सल्ला दिला आहे.
ब्रोकरेज हाऊसने 100 रुपयांपेक्षा कमी असलेल्या या स्टॉकवर 92 रुपये प्रति शेअरचे लक्ष्य दिले आहे. सध्या या शेअरची किंमत 53 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे.
Equitas Small Finance या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास, 70% पर्यंत परतावा अपेक्षित आहे. चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर, ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेवर Buy Call कायम ठेवला आहे. कंपनीने प्रति शेअर लक्ष्य किंमत 92 रुपये ठेवली आहे.
या शेअरमध्ये जानेवारी 2022 मोठी हालचाल झालेली नाही. या उलट 9 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
ICICI सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाहीत बँकेची कमाई 11 टक्क्यांनी वाढून 120 कोटी रुपये झाली आहे. ग्रॅच्युइटी आणि रजा वेतनाबाबतच्या तरतुदी मागे घेतल्याने बँकेला सुमारे 30 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहे. व्यवहारांचे डिजिटलायझेशनमुळे कंपनीला फायदा झाला आहे.
Equitas Small Finance: जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचा निव्वळ नफा 6 टक्क्यांनी (YoY) वाढून 130 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.