मुंबई : केद्रीय अर्थसंकल्पामागे अनेक लोकांची मेहनत असते.
ज्या दिवशी अर्थसंकल्प मांडला जातो त्यादिवशी सर्वसामान्यांपासून बड्या उद्योगपतींचे याकडे लक्ष लागलेले असते. अर्थसंकल्प हा तासाभरून अधिक वेळ मांडला जातो. त्यामध्ये अर्थमंत्र्यांचे भाषण आणि ज्या बॅगेतून अर्थसंकल्प आणला जातो ती बॅग खास असते.
158 वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेमागील काही खास गोष्टी नक्की जाणून घ्या.
भारतामध्ये अर्थसंकल्प आणि अर्थमंत्र्याच्या लाल सुटकेसचे गणित 1860 पासून आहे. 26 नोव्हेंबर 1947 ला भारताला स्वातंत्र्यानंतर पहिला अर्थ संकल्प मांडण्यात आला. शणमुखम शेट्टी यांनी पहिल्यांदा लाल सूटकेसमधून अर्थसंकल्प आणला होता.
1860 साली ब्रिटनचे चान्सलर ऑफ द एक्सचेकर चीफ विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांनी लेदर बॅगेतून पहियांदा आर्थिक लोखा जोखा आणला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली.
बजेटच्या कागदपत्रांवर ब्रिटनच्या राणीचा मोनोग्राम असतो. ब्रिटनच्या राणीने स्वतःहून ग्लॅडस्टनला ही खास सूटकेस गिफ्ट दिली होती. ग्लॅडस्टनचे अर्थसंकल्पाचे भाषण मोठे असे त्यासाठी अनेक कागदपत्रांची गरज लागत होती. तेथूनच अर्थसंकल्पाचे भाषण लांबलचक असण्याला सुरूवात झाली.
ब्रिटनमध्ये ग्लॅडस्टन यांचा बजेट बॉक्स 2010 पर्यंत वापरला जात होता. 2010 साली तो म्युझियमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर नव्या फ्रेश लाल लेदर बजट बॉक्स वापरला जात आहे.
जसे ब्रिटनमध्ये 2010 पर्यंत एकच बॅग वापरली जात होती तशीच भारतामध्येही शणमुखम यांची सूटकेस बॅग वापरली जाते. परंतू बजेटचे डॉक्युमेंट्स आणण्यासाठी अर्थमंत्री नवी सूटकेस वापरतात. लाल रंगामधील शेडची बॅग यादरम्यान वापरली जाते.
माजी राष्ट्रपती आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची सुटकेस खास होती. युपीए सरकारच्या काळात त्यांनी ग्लॅडस्टनप्रमाणे लाल रंगाची सूटकेस वापरली होती.