मुंबई : आणखी एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) आणखी एक संशयित सापडल्याचे समोर आले आहे. याआधी महाराष्ट्रात नागपूर येथे इंग्लंडमधून (Uk)आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह आहे. तो नव्या कोरोना विषाणूचा बाधित आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे. पुणे येथील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात येत आहे. दिल्लीत नव्या कोरोनाच्या (coronavirus strain) संशयित रुग्णाला लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रिटनहून (Britain)मंगळवारी आलेल्या प्रवाशाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रुग्ण असिम्टमॅटिक असल्याची रुग्णालयाने माहिती दिली आहे.
ब्रिटनमधून मंगळवारी ही व्यक्ती भारतात दाखल झाली. त्यावेळी केलेल्या तपासणीत ही व्यक्ती कोरोना बाधित आढळली. या प्रवाशाला कुठलीही लक्षणे नसल्याची माहीती लोकनायक रुग्णालयाचे संचालक डॉ सुरेश कुमार यांनी दिली. या प्रवाशाच्या आता अनेक तपासण्या करण्यात येत आहेत. त्यातूनच नव्या कोरोनाची बाधा झालीय की जुन्या कोरोनाची ही माहिती स्पष्ट होईल.
या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. ब्रिटनमध्ये आढळलेला नवा स्ट्रेन ७० टक्के वेगाने पसरतो त्यामुळे योग्य खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. या नव्या स्ट्रेनमुळे तरुणांना सर्वाधिक बाधा होत असल्याचंही संशोधनाअंती पुढे आले आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांसाठी आयसोलेशनची वेगळी व्यवस्था केल्याची मागिचीही प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, नागपूरमध्ये (New Corona Virus Suspected Found in Nagpur) इंग्लंडहून आलेल्या तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या २८ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे.