Tata Salt Price Hike : महागाईच्या जखमेवर आता ‘टाटा नमक‘; किंमत वाचून येईल भोवळ

 मीठ बनवणारी दिग्गज टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने (Tata Consumer Products) टाटा सॉल्टच्या (Tata Salt) किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. परिणामी महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला हा आणखी एक झटका आहे. 

Updated: Aug 12, 2022, 04:39 PM IST
Tata Salt Price Hike : महागाईच्या जखमेवर आता ‘टाटा नमक‘; किंमत वाचून येईल भोवळ  title=

मुंबई: देशभरात विविध पद्धतीचे उच्च मूल्य असलेले मसाल्याचे पदार्थ अगदी प्राचीन काळापासून घेतले जातात. जर सर्व पदार्थांचे एकत्रिकरण करून केलेल्या खाद्यपदार्थाला चिमूटभर मीठ घातले नाहीतर तो पदार्थ अपुर्ण राहतो. मीठाशिवाय जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. सोबत मानवी शरिराला ते आवश्यकही आहे. मात्र आता  मीठ बनवणारी दिग्गज टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने (Tata Consumer Products) टाटा सॉल्टच्या (Tata Salt) किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. परिणामी महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला हा आणखी एक झटका आहे. (Tata Salt Price Hike )

महागाईत सातत्याने वाढ होत असल्याने कंपनीच्या महसुलावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आपले मार्जिन वाचवण्यासाठी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा सॉल्टच्या सर्वात स्वस्त मिठाच्या एका किलोच्या पॅकेटची किंमत 25 रुपये आहे. महागाईचा परिणाम टाटा सॉल्टच्या मार्जिनवर झाला आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीईओ सुनील डिसोझा (Sunil D’Souza) म्हणतात की मिठावर महागाईचा दबाव वाढत आहे. त्यामुळे भाव वाढवावे लागले आहेत.  

टाटा सॉल्टच्या सर्वात स्वस्त मिठाच्या एका किलोच्या पॅकेटची किंमत 25 रुपये आहे. ती किंमत 28 ते 30 रुपयांपर्यंत वाढू शकते. ही वेगळी बाब आहे की या किमतीत किती वाढ होणार याबाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. डिसोझा म्हणाले की, मिठाच्या किमतीचे दोन घटक आहेत. इथेच दर ठरवले जातात. यामध्ये समुद्र आणि इंधनाच्या किमतींचा समावेश असतो.