मुंबई : शिक्षक म्हणजे गुरु, ज्याच्याकडून आपल्या शिकवण मिळते, विद्या मिळते. ज्यामुळे शिक्षकाला समाजात उच्च स्थान आहेत. खरंतर मुलांचं आयुष्य घडवणं हे या शिक्षकांच्या हातात असतं, कारण ते मुलांसोबत बराच काळ घालवतात. परंतु कर्नाटकातून एक अशी बातमी समोर आली आहे. जी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी आहे. येथील रायचूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
येथे एका शिक्षकाने मुलीच्या आईवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकून तिचा अश्लील व्हिडीओ लीक केला. ज्यामुळे या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपी लहान मुलांसोबत अश्लील कृत्ये करत असल्याचे समोर आले. ज्यामुळे पोलीस 'या' प्रकरणाचा तपास करत आहेत.
मोहम्मद अझरुद्दीन असे आरोपीचे नाव आहे आणि तो सिंगापुरा सरकारी शाळेचा शिक्षक आहे. पोलिसांनी रविवारी सांगितले की, आरोपी शिक्षकावर शाळकरी मुलांशी गैरवर्तन केल्याचाही आरोप आहे.
शिक्षकाविरुद्ध तक्रार आल्यानंतर सार्वजनिक सूचना विभाग आणि रायचूर जिल्ह्याच्या उपसंचालकांनी त्याच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने आरोप केला आहे की, शिक्षकाने तिला शिकवणीसह सरकारी सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. त्या बदल्यात त्याने शरीर सुखाची मागणी केली.
जेव्हा ही महिला त्यासाठी तयारी झाली, तेव्हा आरोपी शिक्षकाने या खाजगी क्षण रेकॉर्ड केला आणि त्याला दाखवून तो पुन्हा त्या महिलेला धमकी देऊ लागला.
ज्यानंतर या पीडितेनं पोलिसात धाव घेतली. त्यानंतर या महिलेच्या तक्रारीवरुन या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस या संदर्भात पुढील चौकशी करत आहेत.