नवी दिल्ली : तेलंगणा विधानसभा निवडणूकी सोबत पाच राज्यांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये कॉंग्रेस चांगल प्रदर्शन करताना दिसतेय. तेलंगणामध्ये कॉंग्रेस पिछाडीवर आहे. तेलंगणाचे निकाल जसजसे समोर येत आहेत तसे कॉंग्रेसने ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सर्व एक्झिट पोल्सना मागे टाकत टीआरएस 60 हून अधिक जिंकणार असल्याच स्पष्ट दिसतंय. कॉंग्रेस तेलंगणामध्ये सरकारवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करतेय पण इथे त्यांना खूप मोठ्या पराजयाला सामोर जाव लागतय.
तेलंगणा कॉंग्रेस कमेटीचे उत्तम कुमार रेड्डींनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मला ईव्हीएम वर शंका आहे. म्हणून आम्ही बॅलेट पेपरने मतदानाची मागणी करत आहोत. ईव्हीएम सोबत छेडछाड झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. व्हीव्हीपॅडमधून निघालेल्या पावत्याही मोजायला हव्यात असंही त्यांनी म्हटलंय.
तेलंगणामध्ये कॉंग्रेसने आपली विरोधी तेलुगू देशम पार्टीशी गठबंधन केल होत. तेलुगुदेशम आणि भाजपाची युती तुटलीय. कॉंग्रेसला इथे यश मिळण्याची अपेक्षा होती. कॉंग्रेस आणि टीडीपी युतीला मोठ यश मिळाल नाही. टीआरएस या निवडणूकीत ओवेसीच्या एमआयएम सोबत मिळून निवडणूक लढवत होती. कॉंग्रेसचे सर्व नेते मिळून निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे उत्तम कुमार यांनी सांगितले.