अदानी ग्रुप या शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; कंपनीचा ग्लोबल मार्केटमध्येही डंका

अदानी उद्योग समूहाची कंपनी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या जून तिमाहीच्या नफ्यामध्ये एक वर्षाच्या तुलनेत 10 टक्के वाढ झाली आहे

Updated: Aug 5, 2021, 02:08 PM IST
अदानी ग्रुप या शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; कंपनीचा ग्लोबल मार्केटमध्येही डंका title=

मुंबई : अदानी उद्योग समूहाची कंपनी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या जून तिमाहीच्या नफ्यामध्ये एक वर्षाच्या तुलनेत 10 टक्के वाढ झाली आहे. या दरम्यान कंपनीने 219 कोटी रुपयाचा नफा कमावला आहे.

मुख्यतः उत्पन्न वाढल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी म्हणजेच जून 2020 मध्ये तिमाही कंपनीला फक्त 22 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जून 2021 च्या तिमाहीमध्ये कंपनीचे एकंदर उत्पन्न वाढून 1079 कोटी रुपयांवर पोहचले आहे.  

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी , 'AGEL ची ग्रोथ सलग वाढत आहे. फक्त 2 वर्षात AGEL पारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ग्लोबल ब्रॅंड म्हणून विकसित होत आहे.' 

अदानी यांनी म्हटले की, एसबी एनर्जीच्या उच्च गुणवत्ता एनर्जी पोर्टफोलियोच्या अधिग्रहनातून जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये AGEL सामिल झाली आहे. कंपनी 2030 पर्यंत  जगातील सर्वात मोठी पारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील कंपनी बनन्याचे लक्ष ठेऊन वाटचाल करीत आहे.

जून 2020 मध्ये AGE च्या शेअरची किंमत 250 रुपयांच्या आसपास होती. आज त्या शेअरची किंमत 890 च्या आसपास आहे. मे 2021 मध्ये शेअरची किंमत 1390 पर्यंत पोहचली होती.