देशातील ते ठिकाण, जिथे घड्याळातील काटे फिरतात उलटे; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

देशात अशी एक जागा आहे जिथे घड्याळ विरुद्ध दिशेने फिरतं. 

Updated: Aug 3, 2022, 01:20 PM IST
देशातील ते ठिकाण, जिथे घड्याळातील काटे फिरतात उलटे; जाणून घ्या काय आहे प्रकरण? title=

छत्तीसगढ : भारत हा विविधतेचा देश आहे. आपल्या देशाची संस्कृती संपूर्ण जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते. यासोबतच देशात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्यामध्ये अनेक रहस्यं आहेत. अशी एक जागा आहे जिथे घड्याळ विरुद्ध दिशेने फिरतं. इतकंच नाही तर लोक लग्नात देखील उलट फेरे घेतात.

भारतातील छत्तीसगडमध्ये हे विचित्र ठिकाण आहे जिथे घड्याळ देखील उलट दिशेने फिरतं. या ठिकाणी घड्याळाचे काटे समाजातील लोक राहत असलेल्या गावाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. म्हणजे इथे 12 वाजल्यानंतर 11 वाजतात. सामान्यांप्रमाणे एक वाजत नाही.

घड्याळ उजवीकडून डावीकडे धावतात

जगात धावणारी सर्व घड्याळं डावीकडून उजवीकडे धावतात. बारा वाजल्यानंतर सर्व घड्याळात एक, नंतर दोन आणि नंतर तीन वाजतात. पण भारतातील छत्तीसगडमध्ये एक गाव आहे, जिथे घड्याळे उजवीकडून डावीकडे धावतात.

म्हणजेच, 12 नंतर 11 आणि नंतर 10 आणि नंतर 9. जेव्हापासून या गावात घड्याळ आलंय, तेव्हापासून सर्व घड्याळं सारखीच उलट दिशेने धावतात. या गावाचं नाव कोरबा असं आहे. याठिकाणी राहणारे आदिवासी हे शक्तीपीठाशी संबंधित गोंड आदिवासी समाजाचे आहेत. ते नेहमी उलट्या दिशेची घड्याळं वापरतात.

यामुळे घड्याळ उलटं फिरतं

स्थानिकांच्या मते, त्यांचं घड्याळ बरोबर चालतं, तर जगातील इतर घड्याळं चुकीची चालतात. पृथ्वी उजवीकडून डावीकडे फिरते, असं समाजाचं म्हणणं आहे. तसंच चंद्रापासून सूर्यापर्यंत आणि तारेही याच दिशेने फिरतात. याशिवाय तलावात पडणारा भोवराही याच दिशेने फिरतो. यामुळेच इथल्या घड्याळांची दिशा अशी ठेवण्यात आली आहे.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)