नवी दिल्ली : चीन, पाकिस्तानच्या वाढती नवी जवळीक पाहून भारतही पुरता सावध झाला आहे. दिवसेंदिवस भारताचे लष्कर अत्याधुनिक होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय लष्करात 'करंज' पाणबुडी दाखल होणार आहे. भारताची वाढती लष्करी ताकद ही चीन, पाकिस्तानची झोप उडवणारी आहे.
करंज पानबुडी ही मेक इन इंडियाचे प्रोडॉक्ट आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेली पाणबुडी भारतीय नौदलात सहभागी होत आहे. स्कॉर्पीन प्रकारातील ही पाणबुडी अगदीच वेगळ्या प्रकारातली पणबूडी आहे. 'करंज' असे पाणबुडीचे नाव आहे. उद्या म्हणजेच ३१ जानेवारीला मुंबईतील माझगांव डॉकयार्डातून ही पाणबुडी लॉन्च होणार आहे.
अत्यंत खतरनाक अशी ही पाणबुडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे. समुद्रातून समुद्रात मारा करण्याची या पाणबुडीची क्षमता आफाट आहे. खोल समुद्राच्या तलाशी लपून वेळ पडताच अचानक उसळी मारत शत्रूपक्षावर हल्ला करणे, हे या पाणबुडीचे महत्त्वाचे वेशिष्ट्य आहे. त्यामुळे ही पाणबुडी चीन आणि पाकिस्तानची चिंता वढवण्यास कारणीभूत ठरणार आहे.
स्काररपीन क्लासची ही पाणबुडी पूर्णपणे भारतीय बनावटीची असून, त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.