ऑकलॅन्ड : न्यूझीलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ५२व्या निवडणुकीत ३ भारतीयांना मोठी संधी मिळाली आहे. १२० सदस्य असलेल्या न्यूझीलंड पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून ३ भारतीय निवडून आले आहेत.
निवडून आलेल्या पाच खासदारांपैकी सरदार कवलजीत सिंह बख्शी हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. बख्शी हे २००१ मध्ये भारतातून न्यूझीलंडला आले असून, ते २००८ पासून, सलगपणे खासदरा म्हणून निवडून येत आहेत. २०१५ ते २०१७ या कालावधीत ते न्यूझीलंडच्या कायदा आणि सुव्यवस्था कमेटीचे चेअरमनही होते.
१९९५मध्ये पंजाबमधील जिल्हा होशियारपूर मधून न्यूजिलंडला गेलेल्या डॉक्टर परमजीत कौर परमार या दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये पीएचडी केल्यावर विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या परमार न्यूझीलंड सरकारमध्ये फॅमेली कमिशनरही राहिल्या आहेत. त्या लेबर पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.
सरदार कवलजीत सिंह बख्शी आणि डॉक्टर परमजीत कौर परमार यांच्यासह प्रियांका राधाकृष्णन यासुद्धा खासदार झाल्या आहेत.