Dinosour Eggs Found in Madhya Pradhesh: इतिहासाबद्दल आपल्या सगळ्यांनाच आकर्षण आहे. त्यातून आपल्या भारतातही अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे इतिहासाच्या पानातील अनेक रहस्य समोर आली आहेत. काही अजूनही आपल्यासाठी रहस्यचं आहेत तर काहींची रहस्य शोधण्याच्या आपण प्रयत्नात आहोतही. सध्या याच प्रयत्न भुर्गभशास्त्राच्या विभागाला यश आलं आहे. भारताच्या मध्यप्रदेश (Madhya Pradesh) या भागात नर्मदाच्या खोऱ्यात चक्क 256 डायनॉसोरची (Dinosours) अंडी सापडली आहेत. यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. शास्त्रज्ञांना मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात 256 जीवाश्म डायनासोरची अंडी (Eggs) आणि घरटी शोधून काढण्यात यश मिळाले आहे. ही जीवाश्म अंडी एका मोठ्या डायनासोरची आहेत. लांब गळ्याच्या टायटॅनोसॉरची आहे. हा डायनासोर शाकाहारी असायचा. (titanosaurs eggs found in dhar madhya pradesh near narmada valley)
दिल्ली विद्यापीठी आणि मोहनपूर - भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था कोलकता आणि भोपाळमधील संशोधकांनी मध्यप्रदेशातील धारमधील बाग आणि कुक्षी भागात ओव्हनम - इन - ओव्हो किंवा ज्याला आपण सोप्या भाषेत बहु-कवच अंडी म्हणू शकतो अशी अंडी शोधल्याचा अहवाल (Research) समोर आला आहे.
धार जिल्ह्यातील बकानेर येथील उच्च माध्यमिक विद्यालयात काम करणाऱ्या विशाल वर्मा, हर्ष धीमान आणि गुंटूपल्ली प्रसाद यांनी हे संशोधन केले आहे. 66 दशलक्ष वर्षापुर्वी नर्मदा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात फिरणाऱ्या लांब मानेच्या डायनासोरच्या अस्तित्वाविषयी मोठे तपशील समोर आले आहेत. येथे सेशेल्स (Seachelles) होते आणि जेव्हा ते इंडियन प्लेटपासून वेगळे झाले तेव्हा येथे असणारा टेथिस समुद्र हा नर्मदेच्या नदीत मिसळला होता. त्याच्या मुखातून ही अंडी सापडली आहेत असं संशोधनकांचे मतं आहे. त्याचबरोबर सेशेल्स वेगळे झाल्यामुळे (सेशेल्स ही 115 भारतीय खंडानजीकची बेट होती) टेथिस हा समुद्र नर्मदा नदीच्या खोऱ्यात 400 किमी आत शिरला होता. त्यामुळे ही घरटीही एकमेकांच्या अगदी जवळ असल्याचे संशोधकांनी सांगितले. वास्तविक आत्तापर्यंत जे संशोधन आले आहे त्यानूसार ती अंडी दूर असतात.
ही सापडलेली अंडी 15 सेमी ते 17 सेमी व्यासाची आहे आणि जी टायटॅनोसॉरच्या (titanosaurs) प्रजातीची आहेत. त्यातून अशी धक्कादायक माहिती समोर येते आहे की, या अंड्यांना जन्माला घालण्यापुर्वी या डायनॉसोरचा मृत्यू झाला असावा.
Vishal Verma, instrumental in bringing out fossilised eggs of dinosaurs from Lower Narmada valley in Dhar dist of Madhya Pradesh.
At #IISF at #Bhopal pic.twitter.com/zxbeoznwm0
— Nivedita Khandekar (@nivedita_Him) January 21, 2023
खारा, ढोलिया रायपुरिया, झाबा, जामनियापुरा या भागांत यापुर्वीही डायनॉसोरची अंडी आणि ती ठेवण्याची जागा सापडली आहे. या माहितीतून असून काही चांगली माहिती समोर येते आहे.