नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या भावांमध्ये पुन्हा एकदा घट झाली आहे. मागच्या १० दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या भावांमध्ये घट झाली नव्हती. ११ जूननंतर गुरुवारी पेट्रोलचे भाव १४ पैसे आणि डिझेलचे भावही १४ पैशांनी कमी झाले आहेत. पेट्रोल-डिझेलची सर्वाधिक घट मुंबईत झालेली आहे. मुंबईत पेट्रोल-डिझेल १४-१४ पैशांनी स्वस्त झालं आहे. तर दिल्लीमध्ये पेट्रोल ११ पैसे, डिझेल १२ पैसे स्वस्त झालं.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होत चालले आहेत. मागच्या २३ दिवसांमध्ये पेट्रोल २.२५ रुपये स्वस्त झालं आहे. तर डिझेलचे भाव मागच्या २३ दिवसांमध्ये १.६७ रुपयांनी कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मागच्या एका महिन्यात ६ डॉलर प्रति बॅरलनं कमी झाल्या आहेत. याचा फायदा ग्राहकांना मिळाला आहे.
दिल्ली : ७६ रुपये १६ पैसे
कोलकाता : ७८ रुपये ८३ पैसे
मुंबई : ८३ रुपये ९२ पैसे
चेन्नई : ७८ रुपये ४३ पैसे
देशातल्या महानगरांमधील डिझेलचे भाव
दिल्ली : ६७ रुपये ६८ पैसे
कोलकाता : ७० रुपये २२ पैसे
मुंबई : ७१ रुपये ९८ पैसे
चेन्नई : ७१ रुपये ५८ पैसे