Trending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का?

Paneer Pasanda : जसजसं नवीन वर्ष जवळ येत आहे तसतसं आपण गुगलवर काय काय केलं याचं सत्य बाहेर येतं आहे. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये गुगलवर भारतीयांनी सर्वाधिक पनीरची एक रेसिपी सर्च मारली आहे. 

Updated: Dec 20, 2022, 07:51 AM IST
Trending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का? title=
trending news Paneer Pasha tops the Google list, so do you know the real name of Paneer and interesting facts nmp

Paneer: प्रत्येक पनीरप्रेमी आणि भारतीयांसाठी आनंदाची बातमी होती, जेव्हा गुगलकडून (Google search 2022) यावर्षीची सर्वाधिक लोकप्रिय यादी जाहीर करण्यात आली. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये भारतीयांनी पनीरची एक डिश सर्वाधिक सर्च केली. ते आहे पनीर पसंदा (Paneer Pasanda)...पनीर आवडीने खाणारे असंख्य भारतीय आहेत. पनीर हे डाएटमध्येही (Diet) सहभागी करतात. कारण त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन मिळतं. 

भारतातील कुठलेही सण असो किंवा लग्न सोहळा पनीरशिवाय पूर्ण होत नाही. अशात पनीरचा शोध कुठून लागला असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल आणि तुम्ही पनीरप्रेमी असाल तर पनीरचा शोधाची रंजक कहाणी (interesting facts) तुम्हाला माहिती असायला हवी. पनीरचा शोध नेमका भारत की देशाबाहेरील आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

पनीरचा शोध कसा लागला?

इतिहासकार सांगतात की, पनीरचा शोध हा 17व्या शतकात भारतातील बंगालमध्ये लागला. दुधात सायट्रीक अॅसिडीची प्रक्रिया करुन पनीर तयार करण्याचा शोध हा त्यावेळी पोर्तुगीजांनी लावला. त्यानंतर बंगालमध्ये दूध फाडून पनीर बनवण्याची सुरुवात झाली. पनीरला छेना या नावानेही ओळखलं जातं. तर पनीर हा एक पर्शियन शब्द आहे. तर परदेशात पनीरला चीझ म्हणून ओळखलं जायचं. तर आता परदेशात कॉटेज चीझ म्हणून पनीर ओळखलं जातं आहे. म्हणून पनीरचा शोध भारतात लागला आणि भारतीयांना पनीर बनविण्याची कला पोर्तुगीजांनी शिकवली असं म्हणता येईल. (trending news Paneer Pasha tops the Google list, so do you know the real name of Paneer and interesting facts)

काही इतिहासकारांनी आणि परदेशी आहारतज्ज्ञांनी पनीर हे परदेशाची शोध आहे असं म्हणायचा प्रयत्न केला आहे. मात्र मुघल सम्राट अकबराच्या काळातील अकबरनामामध्ये पनीरचा उल्लेखही तुम्हा दिसून येईल. त्यानंतर आज भारतात मोठ्या प्रमाणात पनीरचा वापर केला जातो. पनीरपासून भारतात अनेक पदार्थ बनवले जाता. मिठाईमध्येही पनीरचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पनीरचं सेवन जास्त केल्यास तुमचं कोलेस्टेरॉल वाढू शकतं.  याशिवाय एक किलो पनीर बनविण्यासाठी आपल्याला 5 लीटर दुधाची आवश्यकता असते. 

 

हेसुद्धा वाचा - Health Tips : तुम्ही सालीसकट बदाम खाता मग थांबा, नाहीतर...

 

या ग्रंथात पनीरचा उल्लेख 

भारतातील इसवी सन पूर्व सातव्या-आठव्या शतकात लिहिलेल्या 'चरकसंहिता' या आयुर्वेदिक ग्रंथात  पनीरचा उल्लेख असल्याचं म्हटलं गेलं आहे. या ग्रंथात गाय, म्हैस, उंट, घोडी, गाढव, शेळी यांच्या व्यतिरिक्त हत्तीच्या दुधाचे गुण-दोष सांगण्यात आले आहे. या ग्रंथाच्या शेवटच्या श्लोकात 'तक्राकुर्चिका' वर्णन केलं गेलं आहे. यात दूध उकळताना त्यात काही 'द्रव' टाकून ते फुटते, असं म्हटलं आहे. या प्रक्रियेला 'तक्राकुर्चिका' असं म्हणतात. याचा अर्थ 'तक्राकुर्चिका' म्हणजेच पनीर असं इतिहासकारांचं म्हणं आहे.