उत्तराखंडच्या जंगलांमध्ये भडकला वणवा; प्रशासन म्हणतं...

वाचा सविस्तर वृत्त.... 

Updated: May 28, 2020, 08:31 AM IST
उत्तराखंडच्या जंगलांमध्ये भडकला वणवा; प्रशासन म्हणतं...  title=
छाया सौजन्य- अनुप शाह

नवी दिल्ली : एकिकडे संपूर्ण देश coronavirus कोरोना व्हायरसशी लढा देत असतानाच दुसरीकडे एक मोठी नैसर्गिक आपत्ती भारताच्या उत्तराखंड या राज्यावर धडकली आहे. ही आपत्ती आहे, वणव्याची. जवळपास मागील चार दिवसांपासून उत्तरांखंडच्या जंगलांमध्ये वणवा भडल्याची माहिती समोर येत आहे. 

उत्तर भारतात सूर्याचा कहर, तापमानात सातत्त्यानं होणारी वाढ पाहता या भागात भडकलेला वणवा शांत करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. मंगळवारी तर, वणवा आणि तापमानात झालेली वाढ पाहता या भागात पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत उष्णतेची ही लाट आग आणखी भडकवत असून, या आगीच्या विळख्या मोठ्या प्रमाणात हिरवीगार रानं जळून खाक झाली आहेत.

'बिझनेस इनसाईडरच्या वृत्तानुसार जवळपास ४६ जंगलं या वणव्यात खाक झाली आहेत. तर, या आगीनं कैक हेक्टर वनं गिळंकृत केली आहेत. कुमाऊँ भागात वणव्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

मोठ्या प्रमाणात लागलेला हा वणवा पाहता प्राणीमात्रांनाही या परिस्थितीमध्ये बऱ्याच अडचणींचा सामान करावा लागत आहे. सोशल मीडियापासून सर्वत्रच या #UttarakhandBachao असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये या वणव्याचं संकट असतानाच कोरोनाचा प्रादुर्भावही स्थानिक प्रशासनापुढे बरीच आव्हानं उभी करत आहे. यातच आणखी एक आव्हान आहे, ते म्हणजे व्हायरल फोटोंचं. 

 

सोशल मीडियावर फसवे फोटो व्हायरल

 उत्तराखंडमधील वणव्याच्या नावाखाली सोशल मीडियावर अनेकांनी ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये लागलेल्या आगीचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे काही अंशी परिस्थिती आणखी तणावाची झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळं अशा फसव्या फोटोंपासून सावध राहण्याचा इशाराही सध्या देण्यात येत आहे. शिवाय सध्याच्या घडीला या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला बऱ्याच अंशी यश आल्याची माहितीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे.