ट्रिपल तलाक : कोर्टाच्या निर्णयावर कॉंग्रेसची प्रतिक्रीया काय?

घटनाबाह्य आणि मनमानी असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने इस्लाममधील 'ट्रिपल तलाक'वर ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रीया दिली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 22, 2017, 04:29 PM IST
ट्रिपल तलाक : कोर्टाच्या निर्णयावर कॉंग्रेसची प्रतिक्रीया काय? title=

नवी दिल्ली : घटनाबाह्य आणि मनमानी असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने इस्लाममधील 'ट्रिपल तलाक'वर ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रीया दिली आहे.

ट्रिपल तलाकवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेसने म्हटले आहे की, 'न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा एक ऐतिहासिक आणि अत्यंत प्रगतिशील निर्णय आहे. धर्मनिरपेक्ष असलेल्या या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समान अधिकार मिळेन'. दरम्यान, देशातील बहुतांश राजकीय पक्षांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे. 'ट्रिपल तलाक' हा इस्लामचा घटक नाही, असे सांगत त्याबाबत संसदेने एक कायदा करावा. तसेच, असा कायदा अस्तित्वात येईपर्यंत वाट पाहा, पण या पद्धतीचा वापर करू नका, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पाच न्यायाधिशांच्या खंडीपिठाने दोन विरूद्ध एक अशा मताने दिलेल्या निर्णयात ट्रिपल तलाक कायद्याचा दर्जा मिळवू शकला नाही.  न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रोहिंटन फली नरीमन आणि न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी सांगितले की, तलाक हा इस्लामचा मुळ घटक नाही. हा कायद्याने बांधलेला नाही तसेच, शरियतलाही अशा पद्धतीचा तलाक मंजूर नाही.