Shocking News : "देव तारी त्याला कोण मारी" अशी म्हण आहे. मात्र, या म्हणीला साजेसा अनुभव एका तरुणाला आला आहे. सासरच्या त्रासला कंटाळून एक तरुण जीव देण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅकवर(Railway track) आडवा झाला पण तो यातून आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. त्याला साधं खरचटल देखील नाही. उत्तर प्रदेश(Uttar pradesh) के गाजियाबाद येथे ही अजब घटना घडली आहे. वैज्ञानिक कारणामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.
हा तरुण गाजियाबाद येथील मसूरी थाना परिसरात राहणारा आहे. त्याचा त्याची पत्नी आणि सासरच्या मडंळीशीं वाद सुरु होता. सासरचे लोक छळ करत असल्याचा या तरुणाचा आरोप आहे. याच रागातून त्याने त्याने अती प्रमाणात मद्य प्राशन केले आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
दारुच्या नशेत तो थेट रेल्वे ट्रॅकवर पोहचला आणि रेल्वे रुळावर आडवा झाला. समोरुन ट्रेन धडधडत आली, मात्र, एक्सप्रेस ट्रेनच्या लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक दाबला. यामुळे फुल स्पीडमध्ये असलेली ट्रेन या तरुणापासून काही अंतारावर थांबली. हा तरुण आत्महत्या करण्यापासून बचावला आहे. त्याला साध खरचटलं देखील नाही.
लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवून रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या मदतीने या तरुणाला रेल्वे ट्रॅकवरुन बाजूला घेतले. या तरुणाच्या कुटुंबियांशी संपर्क साधून या तरुणाला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, हा तरुण बचावण्यामागे वैज्ञानिक कारण समोर आले आहे.
आत्महत्या करायला निघालेल्या या तरुणानाने भगव्या रंगाचा टी शर्ट घातला होता. तो आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर पोहचला तेव्हा लोको पायलटने या तरुणाने घातलेल्या टीशर्टचा भगवा रंग पाहून तात्काळ ट्रेन थांबवली. लाल आणि भगव्या रंगाची वेव लेंथ (wavelength)अधिक परिणामकारक असते. यामुळेच भगवा रंग पाहून ट्रेनचा लोका पायलट अलर्ट झाला आणि त्याने तात्काळ ट्रेन थांबवली. भगव्या रंगाच्या टी शर्टमुळे या तरुणाचा जीव वाचला असे ट्रेनच्या लोको पायलटने सांगितले.
लाल, भगवा रंग पाहून रेल्वे कर्मचारी लगेच अलर्ट होतात. यामुळेच रेल्वे ट्र्रॅकलगत काम करणारे गनमॅन तसेच इतर कर्मचारी भगव्या रंगाचे जॅकेच परिधान करतात. यामुळे भगवा रंग पाहून रेल्वे ट्रेन तसेच एक्सप्रेसचे पायलट अलर्ट होतात.