उरले फक्त 10 दिवस, मिळणार मोफत गॅस सिलेंडर... काय आहे योजना?

Free Cylinder Scheme : पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत 2023-24 या वर्षासाठी 2,312 कोटी रुपयांचे बजेट जाहीर करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 1.75 कोटी गरीब महिलांना दरवर्षी दोन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत.

राजीव कासले | Updated: Mar 15, 2024, 05:16 PM IST
उरले फक्त 10 दिवस, मिळणार मोफत गॅस सिलेंडर... काय आहे योजना? title=

PM Ujjwala Yojana : होळी सणाला आता केवळ दहा दिवसांचा अवधी उरलाय, या निमित्ताने सरकराकडून मोफत गॅस सिलेंडर (Free LPG Cylinder)  देण्याची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधलं योगी सरकार (Yogi Government) राज्यातील जवळपास 1.75 कोटी पात्र कुटुंबांना मोफत एलपीजी सिलिंडर दिले जाणार आहेत. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत (PM Ujjwala Yojana) मोफत गॅस सिलेंडरचं वाटप केलं जाणार आहे. योगी सरकारच्या योजनेनुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षातून दोनवेळा मोठ्या सणांच्या दिवशी मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. याआधी योगी सरकारने दिवाळीच्या दिवशी मोफत एलपीजी सिलेंडरचं वाटप केलं होतं. 

कसा मिळणार योजनेचा फायदा?
मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचं बँक खातं आधारशी लिंक करावं लागणार आहे. पंतप्रधान मोदींनी 2016 मध्ये उज्ज्वला योजना सुरू केली होती. उत्तर प्रदेश सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 2023-24 या वर्षासाठी 2,312 कोटी रुपयांचे बजेट ठरवलं आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 1.75 कोटी गरीब महिलांना दरवर्षी दोन मोफत गॅस सिलिंडर रिफिल केले जाणार आहेत. 

1.31 कोटीहून अधिक गॅस सिलेंडरचं वाटप
पहिल्या टप्प्यात 1 नोव्हेंबर 2023 ते 15 फेब्रुवारी 2024  दरम्यान 80.30 लाख उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर रिफिल करुन देण्यात आले. दुसरा टप्पा 1 जानेवारीपासून आतापर्यंत सुरु आहे. यात आतापर्यंत 50.87 लाख महिलांना गॅस सिलेंडर रिफिल करून देण्यात आलेत. योगी सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतातापर्यंत एकूण 1.31 कोटी हून अधिक गॅस सिलेंडर देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 नोव्हेंबर 2023 ला ही योजना सुरु करताना लाभार्थी महिलांच्या खात्यात अनुदानाची रक्कम खात्यात जमा केली आहे. 

सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणूकीआधी 8 मार्चला महिला दिनाचं औचित्य साधून गॅस सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची घट केल्याची घोषणा केली होती. मुंबईत आता सिलेंडरची किंमत 802.50 रुपये, चेन्नईत 818.50 रुपये, दिल्लीत  803 रुपये आणि कोलकाता 829 रुपये इतकी आहे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिेझेलच्या दरातही घट केली आहे. . देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थान सरकारनेदेखील पेट्रोल-डिझेल स्वस्तची घोषणा केली आहे.