नवी दिल्ली : बॅकेंत नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. साऊथ इंडियन बॅंकेत भरती सुरू असून बुधवारपासून याची निवेदन प्रक्रिया सुरू झाली आहे.
४६८ प्रोबेशनरी क्लर्क पदांसाठी ही भरती असून ३० डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज करु शकणार आहात.
नोकरीसाठी निवडलेल्या उमेदवारांची वेतनश्रेणी दरमहा ११,७६५ ते ३१,५४० रुपये असणार आहे.
उमेदवारांना दहावी / एसएलसी, बारावी / बारावीच्या किंवा किमान ६० टक्के गुणांचे पदवीधर असणे अनिवार्य आहे.
उमेदवाराला वयाची अट २६ वर्षे असणार आहे.
अनुसूचित जाती / जमाती उमेदवारांना वयोमर्यादा नियम पासून ५ वर्षांचा अवधी मिळणार आहे.
संपूर्ण भारत
जनरल कॅटगिरीतील उमेदवाराकडून ६०० रुपये आवेदन शुल्क आकारले जाणार आहे. एससी / एसटी उमेदवारांसाठी १५० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी www.southindianbank.com ला भेट द्या.