Crime News : प्रत्येकाला आपल्या होणाऱ्या पार्टनरबद्दल किंवा लग्नाबद्दल काही ना काही अपेक्षा असतात. राजस्थानमध्ये (Rajastan Crime news) नववधूंना लुटण्याच्या घटना अनेकदा समोर येतात. आता असेच आणखी एक प्रकरण सीकर जिल्ह्यातून समोर आलं आहे. जिथं वंश वाढवण्यासाठी एका व्यक्तीने दुसरं लग्न केलं, पण लग्नानंतर त्याला कळलं ते ऐकून संपुर्ण कुटुंब शॉकमध्ये आहे.
झालं असं की, तरूणीने तरुणासोबत दुसरं लग्न (marriage) केलं. तरुणाने लग्न केलेल्या मुलीची लग्नाआधीच नसबंदी (Sterilization) करण्यात आली. एवढंच नाही तर काही दिवस एकत्र राहिल्यानंतर पत्नीने घरातून दागिने, रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज घेऊन पळ काढला. नवऱ्याने फोन करून बायकोला बोलवून घेतलं. मात्र, बायको काय परत आली नाही...
अनेक दिवस पत्नी आणि तिचे साथीदार पैसे व दागिने परत करण्यास सांगत होते, मात्र नंतर त्यांनी नकार दिला. लग्नाच्या नावाखाली असेच काम करतो, असं आरोपीने पीडित पतीला सांगितलं. आता त्याला ना पैसे परत मिळणार आहेत ना दागिने. त्यानंतर पीडित पतीने पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय.
आणखी वाचा- महिलेने भर रस्त्यात दिला बाळाला जन्म..नेमकी का आली अशी वेळ..
दरम्यान, पहिल्या बायकोचा मृत्यू झाल्यानंतर घरच्यांच्या सल्यानुसार तरूणाने दुसरं लग्न केलं. पहिल्या बायकोपासून त्याला एक मुल देखील होतं. मात्र, तरुणीने नसबंदी करून तरुणाला फसवलं. आरोपी महिलेने एका वर्षात तीन लग्न केली आहेत. पोलीस आरोपी महिला आणि तिच्या साथिदारांची कसून चौकशी करत आहेत.