मुंबई : सध्या लग्नाचा सीझन आहे. त्यामुळे आपल्या ग्रूपमध्ये किंवा नात्यात लग्न होत आहेत. सोशल मीडियावरही लग्नातील गमतीजमतीचे व्हिडीओ खास शेअर केले जात आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधून होणाऱ्या बायकोचा धाक किती आहे याचा अंदाज येईल.
लग्नाच्या मंडपात नवरदेवानं जे गुरुजींना विधी पूर्ण करताना उत्तर दिलं ते ऐकून एकच हशा पिकला. लग्नाचे विधी सुरू होते. त्यातील काही विधी करताना गुरुजी त्याचा अर्थ समजवून सांगत होते. तेव्हा नवरदेव पटकन एक वाक्य बोलला. त्याच वेळी नववधूला हसू आवरत नव्हतं.
गुरूजी लग्नाचे नियम आणि त्यामध्ये असलेली वचन सांगत होते. हे ऐकून नवरदेवाला हसू आलं त्याने पटकन उत्तर दिलं की हे तर मी गेल्या 6 वर्षांपासून पाळत आहे. त्याचं हे उत्तर ऐकून नववधूलाही हसू आवरत नाही.
हा व्हिडीओ खूप जास्त मजेशीर आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. यावर युजर्सनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.