बाईक चालवणार्‍या तरुणाकडून नशीबाची परीक्षा, अखेर जे नाही घडायचं तेच घडलं... पाहा व्हायरल व्हिडीओ

आपल्या जीवाची पर्वा न करता ओसांडून वाहणाऱ्या नदीच्या पुरावरुन आपली बाईक घेऊन जातो. त्यानंतर त्याच्यासोबत जे घडतं, ते पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.

Updated: Jul 21, 2022, 10:32 PM IST
बाईक चालवणार्‍या तरुणाकडून नशीबाची परीक्षा, अखेर जे नाही घडायचं तेच घडलं... पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : मुसळधार पावसात अनेकवेळा नद्या-नाले तुंबतात. अशा परिस्थितीत, स्थानिक प्रशासन लोकांना सतत इशारा देत असते की, त्यांनी ओसंडून वाहणाऱ्या नदी-नाल्यांवरील पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पण लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि आपल्या मनाला वाटेल ते करतात. परंतु तुम्हाला माहित असेल की, असं करणं किती धोकादायक ठरु शकतं?

सोशल मीडियावर आपल्यासमोर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे मजेदार असतात, तर काही व्हिडीओ हे आपल्याला बरंच काही शिकवतात. हा व्हायरल व्हिडीओ देखील असाच आहे.

ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता ओसांडून वाहणाऱ्या नदीच्या पुरावरुन आपली बाईक घेऊन जातोय. पण त्यानंतर त्याच्यासोबत जे घडतं, ते पाहून तुमचा श्वासच थांबेल.

हा व्यक्ती पुलावरुन बाईक घेऊन जाताना पाण्याचा प्रवाह इतका वाढला की, थोडं पुढे जाताच त्या तरुणाची बाईक आणि तो तरुण नदीत बुडाला. या व्यक्तीचं असं कृत्य पाहून तो त्याच्या नशीबाची परीक्षा घेत असावा असंच म्हणावं लागेल. पण अखेर त्याचा हा प्रयत्न फसलाच.

हे दृश्य खरोखरच हृदय पिळवटून टाकणारं आहे, कारण त्याच्या हा अविचारी धाडसी कृत्याने त्याने त्याचा जीव घेतला असंच म्हणावं लागेल.

नदीत पडल्यानंतर त्या तरुणाचा काहीच पत्ता लागला नाही. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तुम्हाला व्हिडीओ संपेपर्यंत हा व्यक्ती कुठे पडला, तसेच त्याचं काय झालं हे दिसत नाहीय. हा व्यक्ती पाण्याच्या वर आलेला देखील कुठेही पाहायला मिळत नाहीय. तो तरुण कुठे गेला? त्याचं काय झालं याचा काहीही थांग पत्ता लागलेसा नाही.

त्याचा जर कोणी नदीत पडतानाचा व्हिडीओ काढला नसता, तर तो त्या पाण्यात बुडाला की, त्याचं आणखी काय झालं? हे कोणालाच कळलं नसतं.

या घटनेचा व्हिडीओ ज्योती सिंग नावाच्या युजरने ट्विटरवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. ज्योतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कृपया अशा परिस्थितीत रस्ता ओलांडू नका. ते खूप धोकादायक आहे. तुम्ही देखील त्यात बुडू शकता.'' यासोबतच त्यांनी नर्मदा नदीला हॅशटॅग टाकलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण लोकांना असे आवाहन करत आहे की, त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये. अधिक ट्रेंडिंग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा.