शांत झेब्राचे हे रूप कधीही न पाहिलेले...पाडसाच्या जिवावर उठलेल्या प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल

नेहमीच सगळ्यात शांत प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेब्राने एका दुसऱ्या प्राण्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Oct 31, 2021, 09:36 PM IST
शांत झेब्राचे हे रूप कधीही न पाहिलेले...पाडसाच्या जिवावर उठलेल्या प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : वन्य प्राण्यांमधील जबरदस्त झुंज पाहण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यात काही वन्यप्राणी फॉटॉग्राफर नेहमीच असे काही क्षण टिपण्यासाठी तत्पर असतात जे आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करतात. सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे जेथे सगळे लोकं आपले आगळे वेगळे व्हिडीओ तेथे अपलोड करत असतात. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी ही मिळते आणि त्यांचे फॉलोअर्स देखील वाढतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

सोशल मीडियावरील या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नेहमीच सगळ्यात शांत प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेब्राने एका दुसऱ्या प्राण्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. जे खरोखरच सगळ्यांना आश्चर्य करणारे आहे.

झेब्रा तसा शाकाहारी प्राणी आहे, त्यामुळे तो पालापाचोळा खातो. आपण बऱ्याचदा त्याला शांतपणे खाताना किंवा फिरताना पाहिले असेल. परंतु हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. यामध्ये हा शाकाहारी प्राणी चक्क पाडसाला मारण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये झेब्राचा कळप हार्टेबीस्ट (हरणांची एक प्रजाती) च्या बाळावर हल्ला करताना दिसत आहे.

खरेतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये झेब्राचा कळप अचानक हार्टबीस्टच्या पाडसावर हल्ला करू लागतो. सहसा तुम्ही झेब्राला असे करताना पाहिले नसेल. यामुळेच झेब्राचे नवे रुप पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्टबीस्ट आपल्या बाळाला झेब्राच्या झुंडीपासून वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतो. पण एक झेब्रा त्या पाडसाच्या मागे पडतो. झेब्राचे हे रूप खरोखरच धक्कादायक आहे. या पाडसाला हा झेब्रा लाथ मारतो, त्याला डोक्याने उडवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर त्या पाडसावर धाव घेतो. हा असा व्हिडीओ तुम्ही या आधी कधीही पाहिलं नसेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इन्स्टाग्रामवर नेचर27_12 नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ 35 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. झेब्राचे हे रूप पाहून बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. प्रत्येकजण एक प्रश्न विचारत आहे की झेब्रा या पाडसाच्या जीवावर का कुठला आहे? परंतु हे कारण आद्याप समोर आलं नाही.