Weather Updates : थंडीचा कहर होणार; बचावासाठी आताच करा तयारी, पारा उणे 4 अंशापर्यंत जाणार

Weather News Updates : थंडीचा जोर वाढणार आहे. कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. हाडे गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे. कारण पारा उणे घसरण्याची शक्यता आहे.

Updated: Jan 12, 2023, 04:00 PM IST
Weather Updates : थंडीचा कहर होणार; बचावासाठी आताच करा तयारी, पारा उणे 4 अंशापर्यंत जाणार title=

Weather Forecast India : उत्तर भारतात थंडीचा कहर दिसून येत आहे. पुढील आठवडाभर थंडीत अधिक वाढ होणार आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे की, उत्तर भारतात 14 ते 19 जानेवारी या कालावधीत तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. कारण 16 ते 18 जानेवारीदरम्यान कडाक्याची थंडी असणार आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी तापमानाचा पारा उणे 4 अंश सेल्सिअसवरुन दोन अंशांपर्यंत घसरु शकतो, अशी हवामान विभागाने शक्यता व्यक्त केली आहे. 

उत्तर भारतात थंडीचा लाट आली आहे. रात्री धुके आणि दिवसा थंड वारे यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी येत्या काही दिवसांत पुन्हा थंडीचा जोर वाढणार आहे. हवामान तज्ज्ञ नवदीप दहिया यांनी सांगितले की, 14 ते 19 जानेवारीपर्यंत उत्तर भारतात थंडीची लाट येणार आहे. विशेषत: 16 ते 18 जानेवारीदरम्यान थंडीचा कहर जाणवेल. त्यामुळे मैदानी भागात तापमानाचा पारा उणे 4 अंश सेल्सिअसवरुन दोन अंशांपर्यंत घसरु शकतो. 

भारतीय हवामान विभागाने (IMD)इशारा देताना सांगितले आहे की, शनिवारपासून दिल्ली आणि त्याच्या शेजारील राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात मोठी घसरण होऊ शकते. येत्या तीन दिवसांत हवामानात बदल होण्यास सुरुवात होईल

कमाल तापमानात मोठी घसरण होऊ शकते. यामुळे थंडीची लाट येईल. जानेवारीच्या पहिल्या 11 दिवसांत हाडेगोठवणारी थंडी पडली होती. पुढील काही दिवस थंडी आणखी वाढू शकते.  या आठवड्यात उत्तर-पश्चिम भारतात काहीसा दिलासा मिळाल्यानंतर IMD ने देखील इशारा 
दिला आहे की, कडाक्याच्या थंडी होईल. 

23 वर्षातील तिसरी सर्वात भीषण थंडी जाणवत आहे. 2006 मध्ये जेव्हा सर्वात कमी तापमान 1.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते तेव्हा IMD सह हवामानशास्त्रज्ञ आर के जेनामानी यांनीही अशीच परिस्थिती अनुभवली होती. 2013 मध्येही अशीच थंडी पडली होती.

दरम्यान, येत्या काही दिवसांत रिमझिम पाऊस पडू शकतो अशी शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्येही येत्या काही दिवसांत रिमझिम आणि हलका पाऊस पडू शकतो.