मुंबई: लग्न समारंभात अनेक क्षण व्हायरल होत असतात. अनेक मजेशीर गोष्टी घडत असतात. कधी वरमाला घालण्याआधी नवरा-नवरीपैकी कोणीतरी एक रुसलेलं असतं तर कधीकधी काही वादही होतात. सध्या सोशल मीडियावर लग्नातील एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नववधूला डायबेटीस असावा असं या व्हिडीओमध्ये पाहून वाटत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव पत्नीला रसगुल्ला खायला देतो. मात्र वधू तो रसगुल्ला खाण्यास विरोध करते. त्यावर नवरा जबरदस्ती करत तिला रसगुल्ला खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. नवरीही आपला हट्ट सोडत नाही. ती नवरदेवाच्या हातून रसगुल्ला खात नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतच मजेशीर कमेंट्स युझर्सनी केल्या आहेत.
अनेकांनी या तरुणीचं जबरदस्ती लग्न लावलं असावं असा अंदाज व्यक्त केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 10 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर काही युझर्सनी कमेंट्स केली आहे की अशी प्रथा असावी. एका युझरने म्हटलं आहे विमल नाही म्हणून ती खात नसावी असं म्हटलं आहे.