Petrol-Diesel Price Today: Weekend Trip च्या निमित्तानं बाहेर पडणार आहात का? काय सांगता, रोड ट्रीपचाच प्लान आहे? स्वत:च्या वाहनानं भटकंतीसाठी निघणार असाल, तर आताच कारचा Fuel Tank Full करुन घ्या. कारण, (International oil market) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या दरात चढ- उतार होत असतानाच सातत्यानं पेट्रोल- डिझेलचे दरही बदलताना दिसत आहेत. देशातील इंधन उत्पादन कंपन्यांनी 24 फेब्रुवारीसाठी इंधनाचे दर निश्चित करत ते जाहीर केले आहेत.
24 फेब्रुवारीला (Crude oil) कच्च्या तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. ज्यामुळं देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दरही स्थिर आहेत. दर दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास देशातील इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात.
मुंबई - पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27
दिल्ली - पेट्रोल 96.72 , डिझेल 89.62
चेन्नई- पेट्रोल 102.63, डिझेल 94.24
कोलकाता - पेट्रोल 106.03, डिझेल 92.76
मुंबई - पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27
पुणे- पेट्रोल 106.22 रुपये, डिझेल 92.73
नाशिक - पेट्रोल 106.77 रुपये, डिझेल 93.27
रत्नागिरी- पेट्रोल 107.43 रुपये, डिझेल 93.87
सातारा - पेट्रोल 107.18 रुपये, डिझेल 93.66
पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही इंधन कंपन्यांच्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता. याशिवाय एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाहा हे दर कळू शकतात. यासाठी तुम्ही इंडियन ऑईलचे ग्राहक असल्यास RSP सोबत शहराचा पिनकोड लिहून 9224992249 या क्रमांकावर किंवा BPCL चे ग्राहक असल्यास RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर SMS पाठवू शकता.