एकही रुपया खर्च न करता असं मिळवा मोफत शिलाई मशीन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ही योजना प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली आहे.

Updated: Mar 22, 2022, 07:53 PM IST
एकही रुपया खर्च न करता असं मिळवा मोफत शिलाई मशीन, जाणून घ्या संपूर्ण माहिती title=

मुंबई : बऱ्याच महिलांना शिलाई करण्याची किंवा कपडे शिवण्याची आवड असते. परंतु परिस्थीतीमुळे अनेक महिलांना विशेषता ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन विकत घेता येत नाही. परंतु अशा महिला शिलाई मशीनसाठी एकही रुपये खर्च न करता ती मिळवू शकता. आता हे कसं शक्य आहे आणि ती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पंतप्रधान यांनी अशा अनेक योजना आणल्या आहेत, ज्या अंतर्गत अनेक लोकांना सवलती किंवा सुविधा मिळतात. अशाच एका सुविधे अंतर्गत तुम्ही शिलाई मशीन अगदी मोफत मिळवू शकता.

यासाठी पीएम फ्री शिलाई मशीन योजना 2022 अंतर्गत, महिलांना फक्त अर्ज करणे आवश्यक आहे. ही योजना प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली आहे.

पीएम मोफत शिलाई मशीन योजना देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी देईल. भारतातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हे एक चांगले पाऊल ठरू शकते. पीएम मोफत शिलाई मशीन योजना 2022 अंतर्गत, 20 ते 40 वयोगटातील महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

या योजनेत गाव आणि शहरातील महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जन्मतारीख, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, दिव्यांगांसाठी अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र आणि विधवांसाठी विधवा प्रमाणपत्र आवश्यक असेल.

अर्ज कसा करायचा?

सर्व प्रथम तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट www.india.gov.in वर जा. होम पेजवर, शिवणकामाच्या मोफत पुरवठ्यासाठी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. अर्जाच्या PDF ची प्रिंट काढा. त्यानंतर त्यात तुमचा तपशील टाका. शेवटी तुम्हाला तुमची कागदपत्रे जोडावी लागतील.

अर्ज सबमिट केल्यानंतर, कार्यालयातील अधिकारी तुमच्या पत्राची तपासणी करतील. तपासणी केल्यानंतर, तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाईल.