Boxes Near Railway Tracks: देशात रेल्वेचं जाळं सर्वदूर पसरलेलं आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारताचं रेल्वे नेटवर्क चौथ्या स्थानावर आहे. दिवसाला लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. आपण सर्वांनी आयुष्यात अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल. बहुतेक लोकांना ट्रेनने प्रवास करायला आवडते. जेव्हा आपण ट्रेनने प्रवास करतो तेव्हा आपल्याला खिडकीबाहेर झाडे, झाडे, रेल्वे ट्रॅक, निळंभोर आकाश दिसते. त्याचवेळी काही अंतरावर रेल्वे रुळाच्या कडेला मोठमोठे बॉक्स पाहिले असतील. तुम्ही कधी विचार केला आहे का की हे बॉक्स का ठेवले जातात? हे बॉक्स सहसा अॅल्युमिनियमचे बनलेले असतात. मात्र हे बॉक्स नेमके कशासाठी असतात? असा प्रश्न पडतो. रेल्वेनं प्रवास करताना नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. रेल्वेच्या डब्ब्यावरील चिन्ह, रेल्वे स्थानकांची नावं या गोष्टीमागे कारणं आहेत. वास्तविक या सर्व बॉक्सेसचा मोठा उपयोग होत असून केवळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यात सेन्सर बसवलेले असतात. तसेच ट्रेनच्या बोगीची चाके मोजणे हे त्यांचे मुख्य काम आहे.
रेल्वे रुळाबाजूला असलेल्या डब्ब्यांना 'एक्सल काउंटर बॉक्स' म्हणतात. हे बॉक्स तीन ते पाच किमीवर बसवले जातात. हा बॉक्स ट्रेनचे एक्सल मोजतो. हा एक्सल ट्रेनच्या बोगीच्या दोन चाकांना जोडतो. हे उपकरण फक्त त्या एक्सलची मोजणी करते. हा 'एक्सल काउंटर बॉक्स' ट्रेन गेल्यावर सांगते की त्यात चाकांची संख्या किती आहे. यामुळे संभाव्य अपघाताची माहिती मिळते.
बातमी वाचा- Anand Mahindra यांनी भारताच्या लोकसंख्येवर केलं असं ट्वीट, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
रिपोर्ट्सनुसार, हा एक्सल काउंटर बॉक्स कोचमध्ये बसवलेल्या एक्सलची मोजणी करतो आणि पुढील बॉक्समध्ये पाठवतो आणि नंतर तोच क्रम राहतो. एक्सलची संख्या कमी असल्यास किंवा पुढील मोजणीमध्ये फरक असल्यास, हा बॉक्स लाल सिग्नल देतो. यामुळे होणारा अपघात टळतो.