Share market Collaps Reasons: देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परदेशी गुंतवणूकदार सातत्याने शेअर्स विकत आहेत. ही विक्री शुक्रवारीदेखील सुरुच राहिली. त्यामुळे शेअर मार्केट कोसळले आहे. सेंसेक्स 930 अंकांनी कोसळून 81 हजारहून खाली आला. मागील दोन महिन्यातील ही सर्वात खालची पातळी आहे. निफ्टीदेखील 24 हजार 500 रुपयांच्या स्तराहून खाली आला. सेंसेक्सदेखील 930.55 अंकांनी कोसळून 80 हजार 220.72 वर बंद झाला. याप्रकारे निफ्टी 309 अंकाच्या मोठ्या घसरणीसह 24 हजार 472.10 अंकांवर बंद झाला. पण मार्केट सलग का कोसळतंय? यामागची 5 कारणे जाणून घेऊया.
अमेरिकेमध्ये 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. अमेरिकेत इलेक्ट्रॉल काँलेजच्या माध्यमातून याची निवड होते. राष्ट्रपती पदासाठी कमला हॅरीस विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी लढत पाहायला मिळते. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खूप मोठे फंडीगं मिळतंय. एलॉन मस्क यांनीदेखील डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर पाठींबा दिलाय. अशावेळी डोनाल्ड ट्रम्प हरल्यास गुंतवणूकदारांचे पैसे बुडतील, अशी भीती गुंतवणूकदारांच्या मनात आहे. सट्टेबाजारमधून आलेल्या तर्कांवर विश्वास ठेवला तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजून त्यांचा कल आहे. तर अमेरिकेतील माध्यमांनुसार कमला हॅरिस या विजयी होऊ शकतात. एकंदरीत दोघांपैकी कोणाच्या विजय किंवा पराजयाने शेअर मार्केट अस्थिर होऊ शकते, ही भीती गुंतवणूकदारांच्या मनात आहे.
24 फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. हे युद्ध दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे युद्ध मानले जात आहे.यात आतापर्यंत दोन्हीकडचे लाखो नागरिक मारले गेले आहेत. या युद्धाचा परिणाम जगभरात पाहायला मिळतोय. इस्रायल आणि हमास यांच्यात मागच्या एका वर्षापासून युद्ध सुरु आहे. मध्य पूर्वमध्ये तणाव वेगाने वाढतोय.यात आता इराणने एन्ट्री केल्याने जियो पॉलिटीकल टेन्शन वाढले आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर दिसतोय.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. येथे 6 पक्ष लाढतायत. येथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होतेय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही सत्ता कोणाची येणार, मुख्यमंत्री कोण होणार? हे सांगता येत नाही. त्यामुळे गुंतवणूक करायची की नाही, याबाबत गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. या कारणामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत.
खासगी क्षेत्रातील बऱ्याच कंपन्यांचे क्यू 2 निकाल नकारात्मक आले आहेत. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांवर याचा परिणाम पाहायला मिळतोय. आज गोदावरी रिफायनरी आयपीओ लॉंच झाला. प्रतिसाद मिळेना म्हणून डिस्काऊंट जाहीर करण्यात आला. 3 दिवसांपुर्वी आलेल्या ह्युंडईच्या आयपीओने गुंतवणूकदारांचे नुकसान केले. या सर्वाचा एकत्रित परिणाम शेअर मार्केटवर पाहायला मिळतोय.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलने रुपयाची घसरण पाहायला मिळत आहे. विदेशी चनलाच्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूड ऑइलच्या किमतीने रुपयाचा खेळ खराब केला. भारतातून परदेशी गुंतवणूक सातत्याने काढली जातेय, याचा परिणाम रुपयावर दिसून आलाय. विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक विकण्यावर भर देतायत, याचाही वाईट परिणाम रुपयावर झाला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 84 रुपयांवर पोहोचलाय. याचा परिणाम शेअर मार्केट गुंतवणूकदारांवर पाहायला मिळतोय.