नवी दिल्ली : तुमची स्वप्न जर मोठी असतील आणि त्यांचा पाठपुरावा करायची हिम्मत तुम्ही दाखवलीत, तर जगात काहीही अशक्य नसतं... चेन्नईच्या 18 वर्षांच्या मुलानं असंच एक स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आणलं... ही गोष्ट आहे रिफत शारूख याची.
चेन्नईच्या अवघ्या 18 वर्षांच्या रिफत शारूखच्या स्वप्नांचं उड्डाण... रिफतनं तयार केलेला 'कलामसॅट' हा जगातला आजवरचा सर्वात हलका उपग्रह ओरिऑनमधून अंतराळात झेपावलाय.
नासाच्या क्युब्स इन स्पेस या स्पर्धेअंतर्गत 57 देशांमधल्या 86 हजार डिझाईन्समधून रिफतचा कलामसॅट अंतराळात पाठवण्यासाठी निवडला गेला. अवघ्या 64 ग्रॅम वजनाचा हा उपग्रह मोबाईल फोनपेक्षाही हलका आहे. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानानं तयार झालेला जगातला पहिला उपग्रह आहे...
रिफत चेन्नईतल्या स्पेस किड्झ इंडियाचा विद्यार्थी. या संस्थेच्या संचालकांना त्याच्या या देदिप्यमान कामगिरीचा रास्त अभिमान आहे...
रिफतनं आपल्या उपग्रहाला देशाचे दिवंगत राष्ट्रपती सॅटेलाईट मॅन डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं नाव दिलंय... वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्याच्या कष्टांना आणि बुद्धिमत्तेला अग्निपंख लाभलेत...
Chennai: Students who built the world's smallest satellite, rejoice after its launch. The satellite weighing 64 grams was launched by NASA. pic.twitter.com/ak7NP9KzUO
— ANI (@ANI_news) June 22, 2017