लखनऊ : आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 चा शुभारंभ केला. या दरम्यान त्यांनी यूपीमध्ये २२ कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. योगी बोलले की, कर्जमाफी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने झाडं लावणे अनिवार्य आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभागाच्या पत्रिका सिटीजन चार्टरचं देखील उद्घाटन केलं. सोबतच वन मित्र मोबाईल अॅपचा देखील शुभारंभ केला. वन आणि पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. योगींनी प्रदेशात कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांना झाडे लावण्यासाठी सांगितलं आहे. झाड न लावल्यास कर्जमाफी नाही होणार. असं देखी त्यांनी म्हटलं आहे.
योगींनी म्हटलं की, २२ कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशात प्रत्येकाने एक झाडं लावण्याचा संकल्प केला पाहिजे. एका वर्षात २२ कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. यूपीमध्ये 86 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचं सर्टिफिकेट दिलं जात आहे. सर्टीफिकेट देतांना १० रोपं लावण्याचा आणि त्याचं संगोपण करण्याची जबाबदारी देखील दिली जाणार आहे.