Shocking News : जन्म आणि मृत्यू कुणाच्याच हातात नाही. वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरु असताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. यानंतर कुटूंबियांनी मृतदेहासमोर केक कापला. हैदराबाद येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. वाढदिवसानिमित्ताने घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मित्र मंडळी आणि नातेवाईक पार्टीसाठी जमले होते. घरात मोठ्या आनंदाचे वातावरण होते. एका क्षणात हे आनंदाचे वातावरण शोकाकूल झाले.
सचिन असे मृत मुलाचे नाव आहे. तो सोळा वर्षांचा होता. तो आपल्या कुटुंबासह असिफाबाद विभागातील बाबापूर गावात राहत होता. सचिन त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप आनंदी होता. त्याच्या कुटूंबियांनी खास पार्टीचे आजोन केले होते. बर्थ डे पार्टी सुरु असताना सचिनच्या छातीत दुखू लागले. सचिन याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हृदयविकाराच्या झटक्याने सचिन याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेहाजवळ केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. शोकाकुल झालेल्या पालकांनी श्रद्धांजली म्हणून केक सचिनच्या मृतदेहाजवळ ठेवला. हे दृष्य पाहून सचिनच्या अत्यंसस्कारासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील भरुन आले. सचिन हा इयत्ता दहावीत शिकत होता. तो अभ्यासात देखील खूप हुशार होता. त्याचा स्वभाव देखील खूपच मन मिळावू होता असे त्याचे मित्र सांगतात.
जळगावच्या मुक्ताईनगर शहरात कुलरचा शॉक बसून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. वैष्णवी सनांसे असं या तिचं नाव आहे. दुर्दैव म्हणजे घरात वैष्णवीचा वाढदिवस साजरा होत असतानाच, तिला कुलरचा जोरदार शॉक लागला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.
चितेवर अंत्यविधीसाठी ठेवलेला तरूणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेल्याची घटना मालेगावात घडली होती. एका निनावी फोननंतर पोलिसांनी दखल घेत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नेहाचा वाढदिवसादिवशीच मृत्यू झाला होता.तिच्या पार्थिवावर श्रीरामनगरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र निनावी फोनवर एका अज्ञात व्यक्तीने नेहाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा सांगितले. आणि पोलिसांनी दखल घेत थेट स्मशानभूमी गाठली. अंत्यसंस्कारसाठी चितेवर ठेवलेला नेहाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर मंगळवारी दुपारी नेहाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं गूढ उलगडणार आहे.