मुंबई : देशातील दिग्गज मीडिया हाऊस ZEE ने UAE मध्ये होणाऱ्या T20 लीगचे जागतिक मीडिया अधिकार विकत घेतले. UAE च्या या T20 लीगमध्ये मंगळवारी एमिरेट्स बोर्डाने UAE मध्ये होणाऱ्या टी 20 लीगबाबतच्या कराराची घोषणा दिली.
जागतिक मीडिया आणि मनोरंजन पॉवरहाऊस ZEE सोबत दीर्घकालीन मीडिया हक्क करारावर स्वाक्षरी करण्यात आली. लीगचे प्रसारण ZEE च्या लीनियर चॅनेल आणि OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर केले जाणार आहे.
या सामन्यांचे भारतात आणि जगभरात थेट प्रक्षेपण केले जाईल. UAE ची T20 लीग ही एक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आहे, ज्यामध्ये 6 टीम सहभागी असणार अशी प्राथमिक माहिती मिळाली.
6 टीममध्ये एकूण 34 सामने खेळले जाणार आहेत.
100 मिलियन से ज्यादा घरों तक पहुंचेगी लीग
लीग में 6 टीमों के बीच कुल 34 मैच खेले जाएंगे. या संघात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, अदानी स्पोर्ट्सलाइन, कोलकाता नाइट रायडर्स, लान्सर कॅपिटल, जीएमआर ग्रुप आणि कॅप्री ग्लोबल यांचा समावेश आहे.
190 हून अधिक देशांमध्ये ही लीग प्रेक्षकांना आणि भागीदारांपर्यंत पोहोचं काम करणार आहे. ZEE ची मल्टी-प्लॅटफॉर्म रणनीती आणि जाहिरातदार आणि वितरण भागीदारांसोबतचा व्यवसाय लीगला 100 दशलक्ष घरांपर्यंत पोहोचण्यास मदत करणार आहे.
कुठे होणार लाईव्ह प्रसारण
UAE च्या टी 20 लीगचं प्रसारण ZEE च्या 10 लीनियर चॅनलवर होणार आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ भाषांमध्ये ते प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याशिवाय ZEE 5 अॅपवर स्ट्रिमिंग होणार आहे.
टी 20 क्रिकेट लीग लोकांना आवडते हे लक्षात घेऊन UAE च्या एमिरेट्स क्रिकेट बोर्डने UAE टी 20 लीग सुरू केली. UAE T20 लीगचे थेट प्रक्षेपण ZEE ग्रुपद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी, ECB ने आधीच 120 मिलियन डॉलरचा ZEE समूहासोबत 10 वर्षांचा करार करण्यात आला आहे.
ZEE ब्रॉडकास्ट पार्टनर मिळणं हे विश्वसनीय पार्टनर दुसरं कोणी असू शकत नाही असा विश्वास चेअरमन खालिद अल जरूनी यांनी व्यक्त केला. पुनीत गोयंका यांनी राहुल जोहरी यांचे या करारनंतर आभार मानले.
झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे साऊथ आशिया बिझनेस प्रेसिडेंट राहुल जोहरी यांनी प्रतिक्रिया दिली. ZEE म्हणून UAE T20 लीगसाठी मीडिया राइट्स मिळाल्याचा आम्हाला खूप आनंद आहे.
UAE ची T20 लीग भारत आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ZEE आपल्या व्यासपीठाचा उपयोग करू असा विश्वास व्यक्त केला. क्रिकेट आणि मनोरंजनाचा चाहत्यांना डबल डोस मिळणार आहे असंही यावेळी ते म्हणाले.
ECB कडून अधिकृतपणे मंजूर झालेल्या UAE T20 लीगमध्ये 6 टीम असतील आणि एकूण 34 सामने खेळवले जातील. जगभरातील विविध टीममधील अव्वल खेळाडू या लीगमध्ये भाग घेऊ शकतील.
या लीगमध्ये 8 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एका संघात खेळण्याची परवानगी असेल, त्यामुळे ही लीग खूप स्पर्धात्मक होऊ शकते. आयपीएलमध्ये फक्त ४ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना संघात खेळण्याची परवानगी आहे.