CSK vs GT, MS Dhoni: आयपीएलच्या पहिल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) मैदानात आला अन् अख्खं स्टेडियम धोनीमय झाल्याचं पहायला मिळालं. धोनीने खेचलेला सिक्स पाहून धोनीचे चाहत्यांना आभाळ ठेंगणं झालं होतं. तगडी टक्कर देऊन देखील चेन्नईला पहिल्या सामन्यात (CSK vs GT) पराभवाला सामोरं जावं लागलं. गुजरातने सलग तिसऱ्यांदा चेन्नईचा पराभव केला आणि विजयाची हॅटट्रिक नोंदवली. चेन्नईचा पराभव कशामुळे झाला? असा सवाल आता क्रिकेट अड्ड्यावर होताना दिसत आहे. अशातच आता सीएसकेच्या पराभवाला धोनीच जबाबदार असल्याची तीन खेळाडूंनी म्हटलं आहे.
पहिल्या सामन्यापासूनच धोनीने ऑलराऊंडर खेळाडूंवर जोर देण्याचा प्रयत्न केलाय. काल देखील धोनीने मैदानात उतरण्याच्या आधी जडेजा आणि शिवम दुबेला मैदानात पाठवलं. धोनीच्या या निर्णयावर आता सर्व क्रिकेटजगतातून टीका होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan), फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांनी धोनीवर जोरदार टीका केली आहे. हे तिन्ही खेळाडू समालोचन करत असताना धोनीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
जर धोनी 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता, तर संघाची एकूण संख्या वेगळी असू शकली असती आणि कदाचित सीएसकेने पहिला सामना गमावला नसता, अशी टीका होताना दिसत आहे. धोनीने 7 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 14 धावा खेचल्या होत्या. पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे आता गुजरातच्या विजयाची रथ सुरूच असल्याचं पहायला मिळतंय.
A successful final-over chase at the Narendra Modi Stadium to kick off #TATAIPL 2023
The @rashidkhan_19-@rahultewatia02 duo at it again as @gujarat_titans secure a win against #CSK
Scorecard https://t.co/61QLtsnj3J#GTvCSK pic.twitter.com/uKS9xJgIbw
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
दरम्यान, अखेरच्या तीन ओव्हरमध्ये तीस धावांची गरज असताना विजय शंकरने गुडघे टेकवले. त्यानंतर राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि खानसाहब म्हणजे राशिद खानने (Rashid Khan) करामत दाखवली आणि अवघड दिसणारा विजय गुजरातच्या पारड्यात खेचून आणला. त्यामुळे एकवेळी टेन्शनमध्ये असलेला पांड्या रिलॅक्स झाल्याचं दिसून आलं होतं.