मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार तसंच ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः तटकरेंनी ट्विटरवरुन आपल्या कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तटकरे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांच्या आशीर्वादानं लवकरच सेवेत रुजू होईन असं तटकरेंनी ट्विटवरुन सांगितलंय. दरम्यान आतापर्यंत अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ट्विट करत तटकरे म्हणाले, 'सोमवारी माझी कोरोना चाचणी करण्यात आली. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.#Covid_19
— Sunil Tatkare (@SunilTatkare) October 27, 2020
देशात कोरोना रुग्णांचा संख्या मंदावत आहे. त्यामुळे ही अत्यंत दिलासा देणारी बाब आहे. २४ तासात देशात ३६ हजार ६०४ नवे रुग्ण आढळले असून हा आकडा गेल्या तीन महिन्यांमधील सर्वात कमी आहे. सोमवारी देशात कोरोनामुळे ४९० रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत भारतात १ लाख १९ हजार ४९६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
देशातील एकूण रुग्णांची संख्या ७९ लाख ४६ हजार ६५२ वर पोहोचली आहे. देशात सध्या ६ लाख ३० हजार ५४६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ७२ लाख १ हजार ७० रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.