Most Indians are non-vegetarian : जगभरात नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आठवड्यातून दोन ते तीन दिवस याचा आस्वाद घेत असतात. अनेकांना असे वाटते की, मांसाहार खाल्लाने शक्ती वाढते, असा त्यांचा समज असतो. मांसाहार करण्याचे प्रमाण हिवाळ्यात अधिक वाढते. अशीच एक आकडेवारी समोर आली असून ज्यामध्ये चिकन, अंडं की मासे; भारतीयांना जास्त काय आवडतं? याची आकडेवारी समोर आली.
दरम्यान Zomato ने घोषणा केली की ते शाकाहारी अन्न वितरीत करण्यासाठी 'प्युअर व्हेज' डिलिव्हरी सिस्टम लाँच करत आहे. प्युअर व्हेज डिलिव्हरी सिस्टीममध्ये झोमॅटोने असेही सांगितले होते की डिलिव्हरी बॉईजचे कपडे आणि बॅग वेगवेगळ्या रंगांच्या असतील. मात्र, वाढता वाद पाहता झोमॅटोने तो मागे घेतला आहे. व्हेज आणि नॉनव्हेजच्या वाढत्या वादांच्या पार्श्वभूमीवर, भारतातील किती लोकांना व्हेज खायला आवडते आणि किती लोकांना मांसाहार आवडतो हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. शिवाय, भारतातील लोक कोणत्या खाद्यपदार्थांवर सर्वाधिक खर्च करतात हे देखील महत्त्वाचे ठरते.
याचपार्श्वभूमीवर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) ताज्या अहवालात भारतात मासळीच्या वापरात लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, भारतात मासळीचा वापर वाढण्याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि लोकांचे वाढते उत्पन्न. हा अभ्यास भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि वर्ल्ड फिश इंडिया यांनी केला आहे. अहवाल 2005-2006 आणि 2019-2021 ची तुलना करण्यात आली आहे.
अनेकांना चिकन, अंडं की मासे यांसारखे नॉनव्हेड फूड आवडताच. पण यामध्येही भारतीय कृषी सुधार परिषद (Indian Council of Agricultural Research-ICAR ) ने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात मासे खाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वाढते उत्पादन, बदलणारा आहार आणि मांसाची चांगली उपलब्धता यामुळे मासे खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 2005 ते 2021 या कालावधीत देशात मासे खाणाऱ्यांची संख्या 81 टक्क्यांनी वाढली असून त्याची उत्पादन देखील दुप्पट झाले आहे.
अहवालानुसार, मासे खाणाऱ्या भारतीयांची संख्या 66% वरून 72.1% झाली आहे. म्हणजेच टक्केवारीत पाहिल्यास सुमारे 6.1 टक्के वाढ झाली आहे. अहवालानुसार, भारताची एकूण लोकसंख्या 134 कोटी आहे, त्यापैकी 96.6 कोटी लोक मासे खातात. त्याचवेळी, मासे खाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल बोलायचे झाले तर सुमारे 32 टक्के वाढ झाली आहे. 2005-2006 च्या अहवालात मासे खाणाऱ्यांची संख्या सुमारे 73 कोटी असल्याचे सांगण्यात आले. जे सध्या 96 कोटी रुपये झाले आहे.
अहवालात असेही म्हटले आहे की, 2019-20 या वर्षात 5.95 टक्के लोक दररोज मासे खातात. त्याच वेळी, 34.8 टक्के लोक आठवड्यातून किमान एकदा मासे खातात आणि 31.35 टक्के लोक अधूनमधून मासे खातात. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात साप्ताहिक मासे खाण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागात हे प्रमाण 42.7 टक्के आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण 39.8 टक्के आहे. मात्र, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मासळीचा वापर झपाट्याने वाढला आहे.तर अंडी खाणाऱ्यांची संख्या 7.35 टक्क्यांनी वाढली आहे. तर कोंबडी किंवा मांस खाणाऱ्यांची संख्या 5.45 टक्क्यांनी वाढली आहे.