डोळे फडफडणं शुभ की अशुभ, काय म्हणतं विज्ञान? शास्त्रात म्हटलंय, 'अचानक धनलाभ...'

Fluttering of the Eyelids : डोळा फडफडतोय, असं म्हटलं की, समोरून प्रश्न येतो...उजवा डोळा फडफडतो आहे की डावा...कुठला डोळा फडफडणे हा शुभ असो किंवा अशुभ. त्यासोबत महिला आणि पुरुषांसाठी वेगळा नियम असतो का? यामागील वैज्ञानिक अन् शास्त्रीय कारण जाणून घ्या.   

नेहा चौधरी | Updated: Dec 17, 2024, 05:53 PM IST
डोळे फडफडणं शुभ की अशुभ, काय म्हणतं विज्ञान? शास्त्रात म्हटलंय, 'अचानक धनलाभ...' title=

Fluttering of the Eyelids : दैनंदिन जीवनातील एक असा विश्वास म्हणा की श्रद्धा म्हणा डोळा फडफडला म्हणजे काही तरी शुभ किंवा अशुभ घडणार. पण तुम्हाला यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण माहितीये का? सामुद्रिक शास्त्रानुसार तुमचा कोणता डोळा फडफडतोय याला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण म्हणतो सकाळपासून माझा डोळा फडफडतोय, तर समोरून प्रश्न येतो डावा की उजवा? कारण यावर त्याचे शुभ किंवा अशुभ संकेत ठरले असतात. शिवाय शास्त्रानुसार डोळे फडफडण्याचा अर्थ महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळा आहे. सर्वप्रथम सामुद्रिक शास्त्र डोळे फडफडण्याबद्दल काय सांगतो पाहूयात. 

महिलेचा उजवा डोळा फडफडणे म्हणजे शुभ की अशुभ?

समुद्र शास्त्रानुसार महिलांचा उजवा डोळा फडफडणे हे अशुभ मानले जात नाही. उजवा डोळा फडफडणे म्हणजे अप्रिय घटना घडणार आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटणार आहे. तर पुरुषाचा उजव्या डोळ्याची पापणी फडफडल्यावर शुभ संकेत असतो. 

पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे म्हणजे काय?

ही परिस्थिती पुरुषांसाठी पूर्णपणे उलट आहे. पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे हे शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी किंवा आर्थिक लाभ होणार आहे. 

डावा डोळा फडफडला तर?

जर एखाद्या महिलेचा डावा डोळा फडफडला तर हे शुभ संकेत असतं. त्यांना अचानक धनलाभ होतो. तर पुरुषांचा डावा डोळा फडफडला तर त्या व्यक्तीला इजा होण्याची भीती असते. 

एकाच वेळी दोन्ही डोळे फडफडणे म्हणजे काय?

काही लोकांचे दोन्ही डोळे एकाच वेळी फडफडतात. अशावेळी शुभ की अशुभ अशी काळजी लोकांना वाटते. समुद्र शास्त्रानुसार, जर दोन्ही डोळे एकत्र फडफडत असतील तर हे लक्षण आहे की तुमचा एखादा जुना किंवा हरवलेला मित्र लवकरच भेटणार असं संकेत असतं. 

वैज्ञानिक कारण काय असतं?

आपण समुद्रशास्त्राचे कारण जाणून घेतलं आता यामागील वैज्ञानिक कारण जाणून घेऊयात. डोळ्यांच्या पापण्या फडफडणे हे स्नायूंमध्ये काही प्रकारच्या तणावामुळे होते. पुरेशी झोप न मिळणे, टेन्शन घेणे, जास्त थकणे किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ काम करणे यामुळेही पापण्या फडफडत असतात. एलर्जी, चष्मांचा नंबर कमी जास्त झाल्यास किंवा कॅफेनचे अतीसेवन, अकोल्होलचे रोज सेवन आणि मॅग्नेशियमची कमी असल्यासही डोळे फडफडतात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)