Parenting Tips : मुलांना शिस्त लावणे हा यक्ष प्रश्न आज पालकांसमोर असतो. काम आणि घर सांभाळताना पालकांची अनेकदा तारांबळ उडते. अशावेळी पालकांकडून ओरडून कधी तरी मारुन मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो. पण हा प्रयत्न अपयशी ठरतो कारण पालक थोड्या वेळानेच मुलांना जवळ घेतात आणि सगळा प्रसंग मुलं विसरुन जातात. किंवा अनेकदा पालक मुलांना मारल्यावर किंवा ओरडल्यावर स्वतःलाच कारणीभूत ठरवतात. अशावेळी मुलांवर न खेकसता अगदी न ओरडता त्यांना खालील 6 पद्धतीने शिस्त लावू शकता.
पॅरेंटिंग कोच अन्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना शिस्त लावण्यासाठी 66 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसांत तुम्ही मुलांना 6 टिप्सच्या मदतीने योग्य ते वळण लावायचं आहे. मुलांचे संगोपन करत असताना हे 66 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. अशावेळी तुम्ही मुलांच्या प्रत्येक कामाच्या ठराविक वेळा निश्चित करा. जसे की, दुपारच्या वेळेत त्याने झोपावे, सायंकाळी खेळायला जावे तर दिवे लागणीच्या वेळी वाचन, अभ्यास करावा. यामुळीने मुलांना शिस्त लावणे सोपो होईल. फक्त पालकांनी लक्ष द्यावे की, त्या त्या वेळेत ती कामे होत आहेत की नाहीत.
तुम्ही कितीही रागावलेले असाल तरीही तुम्ही मुलांशी अतिशय शांतपणे बोला. संयम मुलाशी बोलताना अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांसमोर कोणतेही अपशब्द वापरू नका. रागाच्या भरात किंवा आरडा ओरडा करुन मुलांशी बोलू नका.
मुलांवर कधीच ओरडून बोलू नका. अतिशय शांतपणे आणि प्रेमाने मुलांशी संवाद साधा. मुलांशी तुम्हाला प्रेमानेच बोलायचे आहे यामुळे त्याला योग्य शिस्त लावण्यासाठी मदत होईल. मुलं तुमचं आहे मात्र त्यावर रागवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मुलाला लेक्चर न देता त्याच्याशी शांतपणे संवाद साधा.
मुलांना कायमच अटेंशन हवे असते आणि पालकांनी ते देणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे पालकांनी कायमच मुलांना वेळ द्या, महत्त्व द्या कारण मुलांना पालकांकडून तेच हवं असतं.
पालक ज्या हक्काने मुलांवर रागावतात अगदी त्याच हक्काने त्यांच कौतुक देखील करा. मुलाने छोटीशी देखील चांगली गोष्ट केली तरी पालकांनी कायम त्यांच कौतुक करावं.