भारतात कायमच संसाराची म्हणजे वैवाहिक जीवनाची तुलना ही गाडीसोबत केली जाते. पती-पत्नी हे गाडीचे दोन चाक असतात. संसाराची गाडी चांगली सुरु राहावी असं वाटत असेल तर नवरा-बायकोचं नातं घट्ट असणं आवश्यक असतं. कारण हे नातं अतिशय नाजूक असतं. तुमची एखादी चूक देखील त्या नात्यातील विश्वास तोडू शकते.
अशावेळी नवऱ्याने बायकोसोबत वागताना काही गोष्टींचा विचार करायला हवा. नवऱ्याने बायकोसोबत कधीच या 3 गोष्टींचा उल्लेख करु नये. नातं घट्ट करण्यासाठी जशा काही गोष्टी आवर्जून कराव्यात तशाच काही गोष्टी नातं टिकवण्यासाठी कटाक्षाने टाळाव्यात.
लूक्सची मस्करी
नवऱ्याने कधीच पत्नीच्या लूक्सवरुन तिची मस्करी करु नये. कारण यामुळे नात्यामध्ये भांडण होण्याची दाट शक्यता असते. कारण या पद्धतीची मस्करी कधीच कोणत्या व्यक्तीला आवडत नाही. तसेच पत्नीच्या माहेरच्यांना देखील लूक्सवरुन बोलणं टाळा. जे आहे ते स्वीकारणं आणि त्यावर भाष्य न करणं आवश्यक असतं. अनेकदा पुरुषाच्या मनात काही नसतं पण त्याने पत्नीच्या लूक्सवर केलेली कमेंट नक्कीच तिला जुन्या किंवा नकारात्मक गोष्टींची आठवण करुन देईल. अशावेळी नवऱ्याने विशेष काळजी घेणे गरजेचं आहे.
नातेवाईकांची मस्करी
पतीने कधीच पत्नीच्या नातेवाईकांची मस्करी करु नये. कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे. पत्नी माहेरच्या व्यक्तींपासून लांब राहते अशावेळी तिच्या घरच्यांना काही बोलणे हे अत्यंत चुकीचे असते. मुली आपल्या पालकांबाबत अतिशय संवेदनशील असतात. मुळात महिलांना फार मस्करी केलेली आवडत नाही. अशावेळी कामावरुन थकून आलेल्या किंवा घरात काम करुन थकलेल्या महिलेला तिच्या नातेवाईकांवरुन मस्करी केली तर तुमच्यामध्ये वाद होऊ शकतो.
आईसोबत तिलना
तसेच नवऱ्याने कधीच पत्नीची तुलना आपल्या आईशी करु नये. जवळजवळ प्रत्येक पती जाणूनबुजून किंवा नकळत आपल्या पत्नीची त्याच्या आईशी तुलना करतो, परंतु ही वारंवार तुलना तुमच्या पत्नीला चिड आणि राग येऊ शकतो. पुरुषांना कायमच आपल्या आईबद्दल विशेष प्रेम असतं. पण हे प्रेम पत्नीला फार मान्य नसतं. अशावेळी ही तुलना तुमच्या वादाचं कारण ठरू शकतं.