उपासाच्या दिवशी बनवा गुलाबी पॅनकेक: स्वादिष्ट आणि पौष्टिक

उपासाच्या दिवशी आपल्याला नेहमीच वेगळ्या आणि आरोग्यदायी पदार्थांची आवश्यकता असते. 'गुलाबी पॅनकेक' हा एक स्वादिष्ट, पौष्टिक आणि साधा पदार्थ आहे जो उपासाच्या दिवसासाठी उत्तम ठरु शकतो.

Intern | Updated: Jan 6, 2025, 05:08 PM IST
उपासाच्या दिवशी बनवा गुलाबी पॅनकेक: स्वादिष्ट आणि पौष्टिक title=

उपासाच्या दिवशी काय बनवावे हा मोठा प्रश्नचं असतो. उपासाला आपण राजगिरा, साबुदाणा ,भगर किंवा फळभाज्या खातो. आज आपण पाहाणार आहोत पिंक पॅनकेकची रेसिपी. राजगीरा पीठ आणि फळांच्या हेल्दी कॉम्बिनेशनमुळे हा पॅनकेक आपल्या उपासाच्या आहारात एक रुचकर पर्याय बनू शकतो. राजगिऱ्याच्या पिठापासून तुम्ही कधी पॅनकेक बवनले आहेत का? चला तर, जाणून घेऊयात राजगिऱ्यापासून बनवलेली ही सोपी रेसिपी.

साहित्य:
1 कप राजगीरा पीठ
2 पिकलेली केळी
1/2 ड्रॅगन फ्रूट (डाळींब किंवा पॅशन फ्रूट देखील वापरू शकता)
2 कप दूध
1/2 चमचा व्हॅनिला इसेन्स
1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर
चवीनुसार मीठ
4 टेबलस्पून मध (आपल्या चवीप्रमाणे कमी-जास्त करू शकता)
साजूक तूप

कृती:
सर्वात आधी, एक मिक्सर घ्या आणि त्यात केळी आणि ड्रॅगन फ्रूट घालून एक पेस्ट तयार करा. मिक्सरमध्ये तयार केलेल्या फळांच्या पेस्टमध्ये राजगीरा पीठ, व्हॅनिला इसेन्स, मीठ आणि बेकिंग पावडर  घाला. सर्व सामग्री छान मिक्स करा. आता त्यात दूध घालून बॅटर तयार करा. एक नॉनस्टिक पॅन गरम करा आणि त्यात थोडं तूप सोडा. मग त्याचे छोटे छोटे पॅनकेक बनवून शिजवायला ठेवा. पॅनकेक दोन्ही बाजूंनी हलक्या आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत शिजवा. पॅनकेक शिजल्यानंतर, त्याला प्लेटवर एकावर एक ठेवून मधाची धार त्यावर सोडा. मध घातल्याने पॅनकेक अधिक रुचकर आणि चवदार लागतात. तुम्ही तयार केलेले गुलाबी राजगीराचे पॅनकेक आता सर्व्ह करा. हवे तर त्यावर थोडं फळं किंवा ताजं द्राक्ष देखील टाकू शकता.

उपयुक्त टिप्स:
1. राजगीरा पीठ हे उपासाच्या दिवशी उत्कृष्ट आहे, कारण त्यात प्रोटीन, फायबर्स आणि खनिजांची भरपूर मात्रा असते.
2. ड्रॅगन फ्रूटमध्ये अत्यंत कमी कॅलोरीज असून त्यात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
3. आपल्याला गोडसर चव आवडत असेल तर, मधाचे प्रमाण थोडं अधिक करून चवीला एक उत्तम गोडपण देऊ शकता.

हे गुलाबी राजगीराचे पॅनकेक चवदार, पौष्टिक आणि एकदम हलके आहेत. उपासाच्या दिवशी हे पॅनकेक तयार करून आपल्या प्रियजनांसोबत स्वादिष्ट ब्रेकफास्ट किंवा नाश्ता एन्जॉय करा