Banned Baby Names Interesting Facts: घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होतं तेव्हा सर्वाधिक चर्चा 2 गोष्टींची असते. पहिली म्हणजे बाळ कोणासारखं दिसतं याची आणि दुसरी म्हणजे बाळाचं नाव काय ठेवायचं याची. कुटुंबाबरोबरच मित्र, नातेवाईकांकडूनही बाळाला काहीसं छान नाव ठेवण्यासाठी मदत घेतली जाते. काही छान नाव सुचलं तर सांग असं पालकांकडून सांगितलं जातं. अनेकदा नातेवाईकही बाळासाठी वेगवेगळी आणि हटके नावं सुचवतात. आपल्याकडे तर बाळाला आई-वडिलांच्या इच्छेनुसार नावं ठेवण्याची मूभा असते. मात्र जगातील काही देशांमध्ये मुलांना काय नाव ठेवावीत यासंदर्भातील सरकारी नियम आहेत, असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आज आपण या लेखामधून कोणत्या देशांमध्ये बाळांच्या नावांसंदर्भात कोणते नियम आहेत आणि नेमकं कोणत्या नावांवर बंदी घालण्यात आली आहे, हे जाणून घेणार आहोत. तुम्हाला हे प्रकरण अगदी सामान्य वाटत असेल तर माहिती म्हणून सांगायचे झालं तर बंदी घातलेलं नाव ठेवल्यास पालकांना थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद काही देशांमध्ये आहे. त्यामुळेच हे नियम भारतीयांना मजेशीर वाटू शकतात मात्र तेथील स्थानिकांसाठी फार महत्त्वाचे आहेत. चला अशाच काही देशांबद्दलची रंजक माहिती जाणून घेऊयात...
अमेरिकेतील जन्मदाखल्याच्या नियमांप्रमाणे काही नावं ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये किंग, क्वीन, जीसस क्राइस्ट, यीशु मसीह, III, सांता क्लॉज, मजेस्टी, एडॉल्फ हिटलर, मसीहा, @ आणि 1069 यासारख्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. काही देशांमध्ये तर टोपणनावांबद्दलचेही विचित्र नियम आहेत.
टोपणनावांसाठी नियम...
ब्रिटनमध्ये मुलांना टोपणनावं ठेवता येतात मात्र तिथे टोपणनावांचीही नोंद करावी लागते, असं 'डेली स्टार'ने म्हटलं आहे. नोंदणी न झालेली नावं स्वीकारली जात नाहीत. नावांमधील अक्षरांचा क्रम, नावं आक्षेपार्ह नको यासारख्या गोष्टींची विशेष काळजी घेतली नाही. तसेच नावांमध्ये काही संख्या किंवा चिन्हांबद्दलचा संदर्भ असेल तर तो योग्यच हवा. तसेच रजिस्टरवर नोंदणी करताना तेथील रखाण्यात मावेल इतक्या लांबीचं नावच स्वीकारलं जातं. मोठ्या नावाची नोंदणी करुन घेतली जात नाही.
कोणत्या देशांमध्ये कोणत्या नावांवर बंदी? पाहूयात यादी...
रोबोकॉप- Robocop (मेक्सिको)
डेविल- Devil (जापान)
ब्लू- Blue (इटली)
खतना- Circumcision (मेक्सिको)
कुरान- Quran(चीन)
सेक्स फ्रूट- Sex Fruit (न्यूझीलंड)
लिंडा- Linda (सऊदी अरब)
स्नेक- Snake (मलेशिया)
शुक्रवार- Friday (इटली)
ग्रीजमॅन एमबीप्पे (फ्रांस)
तालुला हवाई Talula Does the Hula from Hawaii (न्यूझीलंड)
ब्रिज- Bridge (नॉर्वे)
ओसामा बिन लादेन - (जर्मनी)
मेटालिका (Metallica) - (स्वीडन)
प्रिंस विलियम - (फ्रान्स)
एनल (Anal) - (न्यूझीलंड)
इस्लाम- Islam (चीन)
साराह- Sarah (मोरक्को)
चीफ मैक्सिमस - Chief Maximus (न्यूझीलंड)
हैरियट- Harriet (आइसलॅण्ड)
बंदर- Monkey (डेनमार्क)
थोर- Thor (पुर्तगाल)
007 - (मलेशिया)
कैमिला- Camilla (आइसलॅण्ड)
जुडास- Judas(स्वित्झलॅण्ड)
ड्यूक- Duke(ऑस्ट्रेलिया)
नुटेला- Nutella (फ्रान्स)
वुल्फ- Wolf (स्पेन)
टॉम- Tom (पुर्तगाल)