हिवाळा आला की बाजारात अनेक फळं आणि भाज्या मिळतात. गाजर, मटरसोबत पेरू याने मार्केट रंगीबेरंगी दिसतं. पेरू आवडत नाही असं म्हणारे फार कमी लोक आपल्या आजूबाजूला असतात. मार्केटमध्ये अनेक प्रकारेचे पेरू मिळतात, पण खास करून पांढरे आणि गुलाबी पेरू मोठ्या प्रमाणात विकले जातात. पण तुम्हाला कधी विचार केलाय की, पांढरा किंवा गुलाबी कोणता पेरू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तज्ज्ञही नेहमी आहारात हंगामी फळांचा समावेश करण्यास सांगतात. पांढऱ्या रंगाचे पेरू खाणे जास्त फायदेशीर आहे की गुलाबी याबद्दल डायटीशियन शिखा कुमारी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितलंय.
पेरूमध्ये अँटीमाइक्रोबियल, अँटीफंगल, व्हिटॅमिन सी, के, बी6, फोलेट, नियासिन, अँटीडायबेटिक, अतिसारविरोधी, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, तांबे, कार्बोहायड्रेट, आहारातील फायबर इत्यादी पोषक तत्व आढळतात. हे पोटाशी संबंधित समस्या टाळतात. पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता सारखी समस्या उद्भवत नाही. आहारातील फायबर असल्याने ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. अशा स्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी पेरूचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
डायटीशियन शिखा कुमारी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, गुलाबी पेरूमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतं. साखर आणि स्टार्च कमी असतं. क जीवनसत्व आणि बिया कमी किंवा बियाविरहित असतात. ते पेय म्हणून प्यायल्यास उत्तम मानलं जातं. त्याचबरोबर पांढऱ्या पेरूमध्ये साखर, स्टार्च, व्हिटॅमिन सी आणि अधिक बिया असतात. पांढर्या पेरूमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते आणि हे सर्व घटक गुलाबी पेरूमध्ये त्यापेक्षाही अधिक असतात.
गुलाबी पेरूमध्ये कॅरोटीनॉइड नावाचे सेंद्रिय रंगद्रव्य असतो. हे रंगद्रव्य गाजर आणि टोमॅटोला लाल रंग देते. कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण पेरूच्या वेगवेगळ्या जातींनुसार बदलतं. यामुळे ते पांढरे, हलके लाल ते गडद लाल रंगाचे असतात. त्याच वेळी पांढऱ्या पेरूमध्ये कॅरोटीनॉइड खूपच कमी असते त्यामुळे त्याला रंग येत नाही. तसंच पांढऱ्या आणि गुलाबी पेरूच्या चवीतही थोडा फरक असतो. ही संयुगे फळे आणि भाज्यांना लाल, केशरी, पिवळा रंग देतात. कॅरोटीनोइड्स आणि पॉलिफेनॉल ही संयुगे आहेत, जी पेरूला गुलाबी किंवा लाल रंग देतो. दुसरीकडे पांढऱ्या पेरूमध्ये पुरेसे कॅरोटीनोइड्स आणि पॉलिफेनॉल नसतात.
पेरूचे सेवन केल्यामुळे आपल्या अनेक फायदे मिळतात. तज्ज्ञ सांगतात पेरू खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन मिळतो. मासिक पाळीदरम्यान होणारे क्रॅम्प्स, पोटदुखी इत्यादीपासून आराम मिळतो. पचनसंस्थेसाठी खूप चांगले मानलं जातं. वजन कमी करण्यात प्रभावी ठरू ठरतं. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.
कीटकांचा प्रादुर्भाव झालेला पेरू कापल्याशिवाय ओळखणे फार कठीण नाही. बाजारातून पेरू खरेदी करण्यापूर्वी त्याचा पृष्ठभाग काळजीपूर्वक तपासावा. जर तुम्हाला लहान छिद्र, खुणा किंवा असमान रंग दिसला तर समजावे की या पेरूमध्ये किडे असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे कीटकांमुळे पेरूचा रंग बदलतो. पेरू विकत घेण्यापूर्वी तळहाताने हलके दाबावे. पेरू दाबल्यावर खूप मऊ वाटत असेल तर ते विकत घेण्याची चूक करू नका. पेरू जास्त कडक किंवा मऊ नसावा. खूप कडक पेरू कच्चा असू शकतो. मात्र मऊ पेरूमध्ये कीटक असू शकतात. ताज्या आणि गोड पेरूचा सुगंध गोड असतो. जर ते गोड नसतील तर कीडक नसतील. दुसरीकडे, कीडक असलेल्या पेरूंना एक विचित्र वास असू शकतो. असे पेरू कापल्यावर त्यावर छोटे किडे किंवा काळे डाग दिसू शकतात. पेरू खरेदी करण्यापूर्वी त्यांचा वास घेण्यास विसरू नका. पेरू खरेदी करण्यापूर्वी त्याची साल आणि रंग तपासा. पेरूची साल गुळगुळीत, किंचित लवचिक आणि आकाराने जड असल्यास चांगली असली पाहिजे. रंगाबद्दल बोलायचं तर चविष्ट पेरू मिळवण्यासाठी पिवळ्या रंगाचा पेरू विकत घ्यावा. जर तुम्हाला थोडेसे आंबट आवडत असेल तर तुम्ही हिरवे पेरू देखील खरेदी करू शकता. अख्खा पिवळा पेरू विकत घेऊ नका.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)