नांदेड : शहरातील नाल्यात बुडून एका १२ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यु झाला. नांदेड शहरातील पांडुरंग नगरमध्ये ही घटना घडली. नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहरात सर्वत्र पाणि साचले होते.
शहरातील पांडुरंग नगर भागातून मोठा नाला जातो. पाणी पाहण्यासाठी तानाजी उर्फ शुभम शिंदे मित्रांसोबत गेला होता. तोल जाऊन तो या नाल्यात पडला.
नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने शुभम वाहून गेला. प्रत्यक्षदर्शीनी शर्थीचे प्रयत्न करुन त्याला नाल्याचे बाहेर काढले पण त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.