Sanjay Raut : नाशिकमध्ये भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा गैरव्यवहार झाला असून, हे सगळे बिल्डर मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहेत असा आरोप राऊत यांनी केला आहे. बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी रुपयांची कशी खैरात केली याचा खुलासा करणार असल्याचा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे.
नाशिक महानगरपालिका हद्दीत नगर विकास खाते अंतर्गत भूसंपादन घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात आठशे कोटीचे गैरव्यवहार झाले आहेत. नाशिक मधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाला गेले यासंदर्भात माझं काम चालू आहे अस संजय राऊत म्हणले.
या घोटाळ्याबाबत रितसर तक्रार करणार आहे. नगर विकास खात मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली आहे. सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये अशाप्रकारे घोटाळे होत आहेत. हा जो पैसा राजकारणामध्ये येत आहे. सध्या महाराष्ट्रात तो कोणत्या माध्यमातून येत आहे त्याचा खुलासा देखील करणार आहे. विशेषतः नाशिक महानगरपालिका एका नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात भूसंपादनात 800 कोटी रुपये गैर मार्गाने गोळा केले हा जनतेचा पैसा आहे
हा पैसा मग शिवसेना फडणवीस गट आहे त्यांच्याकडे कसा पोहोचत आहे हे मी दोन दिवसात तुमच्याकडे पुरावा सहित देणार आहे. नगर विकास खात्याचा घोटाळा सरकार कोणाचाही असेल नगर विकास मंत्री तेच होते आणि तेच आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
साधारण 17 ते 18 महत्त्वाचे बिल्डर आहेत ते शिवसेना फडणवीस गटाशी संबंधित आहेत. त्यांना हा लाभ मिळावा म्हणून हे भूसंपादनाचा रेटा लावला शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत बिल्डरांना पैसे मिळाले भूसंपादनाचे हे सगळे बिल्डर मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहेत. समृद्धी मध्ये देखील तेच झाले आहे. ती ठिकाणी भूसंपादनाच्या बाबतीत हेच होत आहे असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले आहेत. मी फक्त सध्या नाशिक महानगरपालिकेतल्या भूसंपादनाचा एक प्रकरण देणार आहे त्यानंतर या राज्यामध्ये काय चाललं आहे ते तुम्हाला कळेल. पुराव्यासह फाईल सादर करेण असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.