Ajit Pawar and Devendra Fadnavis : पुण्यात राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या चक्क कानगोष्टी पाहायला मिळाल्या. (Politics News) संभाजीराजेंबद्दलच्या अजित पवार यांच्या विधानानंतर पहिल्यांदाच अजित पवार, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर आले. (Maharashtra Political News) यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केले त्यानंतर तिघेही गप्पांमध्ये रंगलेले दिसले. अजित पवार यांनी फडणवीस यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या. याचीच चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.
पुण्याच्या बालेवाडी स्टेडिअममध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाट काल करण्यात आले होते. यावेळी ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर होते. या व्यासपीठावर राखीव असलेल्या खूर्चीवर संबंधित व्यक्तींचे नाव लिहिण्यात आले होते. त्यानुसार, क्रीड आणि युवक कल्याण मंत्री गिरिश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार एका रांगेत खुर्चीवर बसले होते. मात्र, कार्यक्रम उशिराने सुरु झाला. त्यामुळे कार्यक्रमाचे उद्घाटन होताच देवेंद्र फडणवीस दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री असे लिहिलेल्या राखीव खूर्चीवर बसले. अजित पवार यांच्यासाठी राखीव असलेली खूर्ची तेव्हा रिकामीच होती.
विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री असलेल्या राखीव खूर्चीत बसल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. पुण्यातील कार्यक्रमात ते काही वेळापुरते का होईना बसले पण, आता याची चर्चा होताना दिसत आहे. सत्तातरांच्या नाट्यानंतर पुन्हा एकदा पवार आणि फडणवीस पुण्यात एकाच व्यासपीठावर एकत्र दिसल्याने याचीच जास्त चर्चा होताना दिसत आहे. नववर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे हे या कार्यक्रमाच्या निमित्त एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार आणि भाजप यांच्याशी नाते चांगले असल्याचे या निमित्ताने दिसून आले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या गुजगोष्टीही पाहायला मिळाल्यात. त्याआधी फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधीची राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र, पवार आणि फडणवीस यांचे हे सरकार अडीच दिवसात कोसळलं. त्यानंतर अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, या घडामोडींना एक वर्ष पूर्ण झाले असले तरीही अजून विरोधकांकडून या मुद्द्यांवर टीका- टिप्पणी करताना दिसत आहे. या सर्व घडामोडींनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकाच मंचावर गुजगोष्टी पाहायला मिळाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.