Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न ( Gold Sumggling) केला आहे. याबाबत महिलेची चौकशी सुरू आहे. सोन्याची पेस्ट करून तिनं औषधांच्या स्वरूपात आपल्या बॅगेतून ही तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही महिला परदेशातून आली असून तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं आढळल्याची माहिती आहे. (a lady smuggling gold paste in a form of medicine capsule at pune airport police investigates)
पुणे विमानतळावर अनधिकृतरित्या सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करताना एका महिलेला पकडण्यात आले आहे. तिच्याकडे तब्बल 270 ग्रॅम सोन्याची पेस्ट सापडली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या पुणे-बँकॉक या आंतरराष्ट्रीय विमानाने ही महिला पुण्यात आली होती. कस्टमच्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सोन्याच्या तस्करीबाबत विभागाला गुप्तचर यंत्रणेमार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार स्पाईस जेट कंपनीचे पुणे-बँकॉक विमान पुणे विमानतळावर आल्यावर संशयित महिलेची तपासणी करण्यात आली. तिच्याकडे 270 ग्रॅम सोन्याची पेस्ट आढळून आली. ही सोन्याची पेस्ट औषधाच्या गोळ्यांच्या कॅप्सुल स्वरूपात होती.
तपासणीनंतर मिळालेल्या माहितीनुसार ही महिला मुळची दिल्लीची आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री यांच्या हस्ते नुकतेच पुणे-बँकॉक (Pune Bangkok) या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे (International Airport) उदघाटन करण्यात आले आहे. ही विमानसेवा पुणेकरांना थेट आंतरराष्ट्रीय प्रवास करता यावा या करिता सुरू करण्यात आली आहे. मात्र काही लोकांनी या सेवेचा गैरफायदा घेण्यास सुरूवात केल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
यवतमाळ शहरात धाडसी घरफोडी करून पोलिसांपुढे आव्हान निर्माण करणाऱ्या 2 चोरटयांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्याचांदीचे दागिन्यांसह रोख असे 22 लाख 67 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या शेर अली उर्फ रहीम भोती सैयद याने विक्की सारवे याच्या मदतीने अरूणोदय सोसायटी येथील पन्ना जयस्वाल यांचे घर फोडून 38 तोळे सोने व नगदी 6,85,000 रूपये चोरले होते. सीसीटीव्हीच्या आधारे ह्या चोरीचा छडा एलसीबी पथकाने लावल. बालाजी सोसायटी येथील बांधकाम विभागाच्या निवृत्त अभियंत्याकडे केलेल्या चोरीची कबुली देखील आरोपींनी केली असून त्याचा तपास सुरू आहे.