Pimpri Chinchwad News Today: पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खेळत असलेल्या मुलीच्या अंगावर लोखंडी गेट पडले. हा अपघात इतका भयंकर होता की मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. बोपखेलमध्येही घटना घडली असून संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही दृश्य इतकी भयंकर आहेत की तुम्हाला विचलित करु शकतात. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, चिमुरडीच्या मृत्यूने कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे.
बोपखेलमध्ये गणेश नगर गल्ल्ली नंबर दोनमध्ये काही लहान मुलं खेळत होते. खेळत असताना अचानक लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. गिरिजा गणेश शिंदे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, पालकांनीही मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी गणेश नगरमध्ये चार मुलं खेळत होती. त्यापैकी दोघे लोखंडी गेटच्या आत गेले. त्यानंतर गिरीजा आणि तिची दुसरी मैत्रिण गेटच्या समोरच उभे होते. त्याचवेळी दुसरा मुलगा गेट ओढत असल्याने व्हिडिओत दिसत आहे. त्याचवेळी ते शेकडो किलोचे गेट चिमुकलीच्या अंगावर कोसळलं. चिमुरडी त्याखाली दबली गेली. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या दोन मुलांनी लगेचच तिच्या पालकांना बोलवून आणलं. नंतर परिसरातील लोकदेखील आवाजाने खाली आले
लोखंडी गेट चिमुरडीच्या अंगावरुन काढण्यात आले. मात्र, प्रचंड वजनाचे गेट तिच्या अंगावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. गेटखाली दबली गेल्याने ती जखमी झाली होती. त्यामुळं उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घडनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, हा गेट नादुरुस्त असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या आणि बिल्डिंगच्या मालकाला माहिती होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. तसंच, दिघी पोलिस ठाण्यात दुःखद घटनेची नोंददेखील करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलाने चौदाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. अल्पवयीन मुलाने आत्महत्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. लॉग ऑफ आणि आय क्विट अशा शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळं गेमच्या नादात विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.