नाशिकच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील एसीच्या दुरुस्तीचं काम सुरू

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार यंत्रणेची स्थिती अत्यंत गंभीर बनलीय. झी 24 तासाच्या बातमीनंतर आयसीयूत बंद पडललेल्या एसीच्या दुरुस्तीचं काम सुरू झालंय. पण अजूनही तो एसी दुरूस्त झालीय.   

Updated: Mar 30, 2018, 09:20 AM IST
नाशिकच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील एसीच्या दुरुस्तीचं काम सुरू title=

नाशिक : नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार यंत्रणेची स्थिती अत्यंत गंभीर बनलीय. झी 24 तासाच्या बातमीनंतर आयसीयूत बंद पडललेल्या एसीच्या दुरुस्तीचं काम सुरू झालंय. पण अजूनही तो एसी दुरूस्त झालीय.   

दोन दिवसांपासून सिटीस्कन मशीन बंद पडलेय. डायलिसिस अखेरच्या घटका मोजत आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील वातानुकूलित व्यवस्था बंद होती मात्र झी 24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आल्याने ac दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केलीय.

सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष

विशिष्ट तापमानाच्या अभावी लाखो रूपये किंमतीची यंत्रणा नादुरूस्त होते. सुपर स्पेशालिटीबाबत खर्चाचे हेड्स आणि पदाबाबत विशेष मान्यता न मिळाल्याने उसनवारीवर काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष आणि शासनाने रखडवलेला निधी यामुळेच रूग्णालयाची दूरवस्था झालीय. 

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचं पालकत्व असलेल्या नाशिक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची ही अवस्था असेल तर इथल्या आरोग्य यंत्रणेचे काय तीन तेरा उडाले असावेत याची कल्पना येईल. आता मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्या नाशिकमधल्या रूग्णांसाठी मुख्यमंत्री पालकत्वाच्या भूमिकेतून काय उपाययोजना करतील?