खंडाळा बोगद्यात अपघात : पुणे-मुंबई वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली. परंतु, सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 30, 2017, 06:17 PM IST
खंडाळा बोगद्यात अपघात : पुणे-मुंबई वाहतूक विस्कळीत  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली. परंतु, सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील खंडाळा बोगद्यात कारचा अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. त्याचा परिणाम मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर झाला आहे. 

अपघात झालेली कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. मात्र भरधाव वेगामुळे खंडाळा बोगद्यात कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट बोगद्याच्या भितींवर आदळली. या जबरदस्त धडकेमुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि बाकी तिघेजण जखमी झाले. या तिघांवर सध्या लोणावळ्यातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  

या अपघातानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. सध्या आयआरबीच्या कर्मचाऱ्यांकडून ही कार रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात पूर्ववत झाली असली तरी वाहने अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत आहेत.